देवलगाव-येरंडी जंगल परिसरात उघडकीस आली. यशवंत बारकू राऊत (५५) रा. येरंडी देवलगाव असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार येरंडी येथील काही गुराखी मंगळवारी जंगलात गुरे चारण्यासाठी गेले असता त्यांना एक इसम झाडाला फाशी लावलेल्या स्थिती आढळला. त्यांनी याची माहिती गावात पोहचून गावकऱ्यांना दिली. गावकऱ्यांनी ही माहिती नवेगावबांध पोलिसांनी दिली. माहिती मिळताच नवेगावबांध पोलीस स्टेशनचे ठाणेदार जनार्दन हेगडकर आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी भेट देऊन प्रथमदर्शनी पाहणी केली. त्यात पोलिसांना आक्षेपार्ह काहीही दिसले नाही. पोलिसांनी येरंडी व देवलगाव येथील पोलीस पाटलांना बोलावून मृतकाची ओळख पटवून घेतली. दरम्यान, यशवंतने आत्महत्या का केली या मागील कारण कळू शकले नाही. या प्रकरणाचा तपास नवेगावबांध पोलीस करीत आहे.