अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नैसर्गिक संकटे,शेतमालाला मिळणारा अल्प दर, कर्जाचा वाढता डोंगर आणि शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. या सर्व गोष्टींमुळे आलेल्या नैराश्यातून शेतकरी आत्महत्त्यांचे प्रमाण वाढ आहे. जिल्ह्यात मागील वर्षी १९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर चालू वर्षात दोन शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे दोन शेतकऱ्यांनी गळफास घेवून आत्महत्या केली. त्यामुळे धान उत्पादकांचा आणि संपन्न जिल्हा अशी ओळख असणाºया जिल्ह्यात शेतकरी आत्महत्त्यांचा ग्राफ वाढ आहे.महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्त्यांचे प्रमाण विदर्भात आहे. मागील वर्षभरात महाराष्ट्रात १५ हजार ७४० शेतकºयांनी आत्महत्त्या केल्याची नोंद शासन दरबारी आहे. तर बऱ्याच शेतकरी आत्महत्त्या या अपात्र ठरवून त्यांची नोंदच केली जात नाही. त्यामुळे या आकड्यात अजून वाढ होवू शकते. शेतकरी आत्महत्त्या ही अंत्त्यत दुर्देवी बाब असून शेतकºयांवर आलेली संकटे आणि वर्तमान परिस्थिती व शासकीय धोरणामुळे यात वाढ होत असल्याची बाब आता लपून राहीलेली नाही. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गोंदिया जिल्ह्यात शेतकरी आत्महत्त्याचे प्रमाण नगण्य होते. मागील १८ वर्षांच्या जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्त्यांवर नजर टाकली असता सुरूवातीचे पाच वर्ष जिल्ह्यात एकही शेतकरी आत्महत्त्या नोंद नव्हती. मात्र २०१५ मध्ये, २०१६ मध्ये ३१ आणि २०१७ व २०१८ या दोन वर्षांत ३५ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्याची नोंद शासन दरबारी झाली आहे. त्यामुळे धानाचे कटोरा आणि संपन्न जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मागील चार पाच वर्षांच्या कालावधीत शेतकरी आत्महत्त्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. त्यामुळे निश्चित ही बाब सर्वांसाठी चिंतनीय आहे. जिल्ह्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्त्यांमागील कारणांचा वेळीच शोध घेवून त्यावर राजकारण करण्याऐवजी उपाय योजना करण्याची गरज आहे. संकटातील शेतकºयांच्या पाठीशी राहून त्यांच्यांसाठी धोरणात्मक उपाय योजना राबविण्याची गरज आहे. तरच शेतकरी आत्महत्त्यांचा वाढ ग्राफ शक्य होईल अन्यथा अन्य जिल्ह्यांसारखेच चित्र जिल्ह्यात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.मागील तीन वर्षांत संकटेजिल्ह्यातील शेतकरी मागील तीन वर्षांपासून कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाला तोंड देत आहे. मागील वर्षी पिकांवर कीडरोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला गेला. तर ऐन रोवणीच्या कालावधी पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील ५७ हजार हेक्टर क्षेत्र रोवणीविनाच राहिले. परिणामी शेतकºयांवरील कर्जाचा डोंगर वाढला. वर्षभर कुटंूबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, बँका आणि सावकारांची देणी कशी फेडायची याच चिंतेतून शेतकरी आत्महत्त्येचे पाऊल उचलत असल्याचे चित्र आहे. मात्र हे चित्र बदलण्यासाठी वेळीच प्रभावीपणे उपाय योजना राबविण्याची गरज आहे.वाढता लागवड खर्च चिंतेची बाबखते, बियाणे आणि शेतीच्या मशागतीच्या खर्चात दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर नैसर्गिक बदलांचा शेतीवर झपाट्याने परिणाम होत आहे. त्यामुळे उत्पादनात सुध्दा घट होत आहे. शेतीचा लागवड खर्च आणि उत्पादनानंतर शेतमालाची विक्री केल्यानंतर अल्प रक्कम हाती येत आहे. त्यामुळे लागवड खर्च आणि उत्पन्न याचा मेळ बसत नसल्याने शेती म्हणजे घाटे का सौदा होत चालली आहे. या दोन्ही गोष्टी शेतकºयांसाठी चिंतेच्या ठरत आहे.अपात्र प्रकरणाचे प्रमाण अधीकजिल्ह्यात मागील १८ वर्षांत एकूण २५० शेतकरी आत्महत्त्यांची नोंद झाली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने यापैकी केवळ १३६ शेतकरी आत्महत्त्या मदतीस पात्र ठरविल्या असून तब्बल ११४ शेतकरी आत्महत्त्या अपात्र ठरविल्या आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्त्येची प्रकरणे नेमकी कुठल्या आधारावर अपात्र ठरविली जातात हे मात्र समजायला मार्ग नाही.
जिल्ह्यात वाढतोय शेतकरी आत्महत्यांचा ग्राफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 9:56 PM
अंकुश गुंडावार। लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : नैसर्गिक संकटे,शेतमालाला मिळणारा अल्प दर, कर्जाचा वाढता डोंगर आणि शासनाच्या शेतकरी विरोधी ...
ठळक मुद्देशासकीय धोरणांचा फटका : अपात्र प्रकरणाचे प्रमाण अधीक