शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार घराण्यात कटुता; दूर होईल असे वाटत नाही; अजित पवार यांनी प्रथमच व्यक्त केले मत
2
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
3
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
4
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
5
Niva Bupa Health IPO : ₹७४ च्या शेअरनं दिला ६% लिस्टिंग गेन; पण जून तिमाहीत थंड होता निवा बुपाचा व्यवसाय, शेअरची स्थिती काय?
6
केंद्रीय मंत्र्यांनी केलं वाचनालयातील पंख्याचं उदघाटन, आता फोटो होताहेत व्हायरल   
7
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
8
Share Market Today : घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
9
अमित ठाकरे यांना मतदान का करावे? ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितले 'हे' 10 मुद्दे
10
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
11
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
12
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
13
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
14
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
15
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
16
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
17
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
18
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
19
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
20
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!

‘मागेल त्याला शेततळे’ १०८ टक्के उद्दिष्ट पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:11 AM

शाश्वत शेती व दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाव्यतिरिक्त राज्य सरकारतर्फे ‘मागेल त्याला शेततळे’ व ‘ मागेल त्याला बोडी’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्याने १०८.३३ टक्के उद्दीष्ट पूर्ती केली आहे.

ठळक मुद्दे७३ टक्के कामांचे फोटो अपलोड : ६५० पैकी ६३८ लाभार्थ्यांना अनुदान वाटप

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शाश्वत शेती व दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाव्यतिरिक्त राज्य सरकारतर्फे ‘मागेल त्याला शेततळे’ व ‘ मागेल त्याला बोडी’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्याने १०८.३३ टक्के उद्दीष्ट पूर्ती केली आहे. ६५० शेततळी व बोडीचे ६३८ चे अनुदान वितरीतकरण्यात आले. उर्वरीत लाभार्थ्यांना अनुदान देण्याची प्रक्रीया सुरू आहे.जिल्ह्याला सन २०१६-१७ व २०१७-१८ यासाठी ४५० शेततळे व बोडी तयार करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. परंतु जिल्हा कृषी विभागाने ३१ मार्च २०१८ पर्यंत उद्दीष्ट पूर्ती केली. यानंतर एप्रिल महिन्यात जिल्हा कृषी विभागाच्या मागणीवर शासनातर्फे १५० शेततळे व बोडी मंजूर करण्यात आले होते. जिल्ह्यात ६०० शेततळे-बोडीचे काम उद्दीष्टापेक्षा अधिक असून ६५० चे काम १ मार्च २०१९ पर्यंत पूूर्ण करण्यात आले.बोडी-शेततळ्यासाठी २०५८ लोकांनी सेवा शुल्कासह अर्ज सादर केले होते. यापैकीे १५३५ शेतकऱ्यांना पात्र तर ४५६ शेतकऱ्यांना अपात्र केले होते. ६७ अर्जाची छाणणी करण्यात आली नाही.पूर्ण झालेल्या बोडी व शेततळे यात गोंदिया ८८, तिरोडा १३३, गोरेगाव १३८, अर्जुनी मोरगाव ३९, देवरी १३६, आमगाव ५५, सालेकसा ५४ व सडक-अर्जुनी ७ चा समावेश आहे.४७६ शेततळे व बोडींचे फोटो अपलोडतयार करण्यात आलेल्या ६३५ शेततळे व बोडींपैकी ४७६ चे फोटो आॅनलाईन अपलोड करण्यात आले असून उर्वरीत काम सुरू आहे. यात गोंदिया तालुक्यात ४६, तिरोडा ५३, गोरेगाव १३१, अर्जुनी-मोरगाव ३९, देवरी ११०, आमगाव ५१, सालेकसा ४१, सडक-अर्जुनी ५ शेततळे व बोडींचा समावेश आहे.६.३५ कोटी वाटपसन २०१६-१७, सन २०१७-१८ व २०१८-१९ मध्ये आतापर्यंत लाभार्थ्यांना ६ कोटी ३५ लाख रूपये वाटप करण्यात आले. जिल्ह्यात सन २०१६-१७ मध्ये १९३ शेततळे व बोडींचे काम पूर्ण करण्यात आले. यासाठी ८२ लाख ६० हजार रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला. तर सन २०१७-१८ मध्ये मार्च अखेरपर्यंत १ कोटी २ लाख रूपये वाटप करण्यात आले. एप्रिलपासून आतापर्यंत १ कोटी ३ लाख ८० हजार ३८९ रूपये खर्च करण्यात आले.