शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

सरकारसह शेतकरीही संकटात, आता कुणाकडे मांडायची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2022 5:00 AM

शासनाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला ठरवून दिलेली धान खरेदीची मर्यादा आठ दिवसांपूर्वीच पूर्ण झाल्याने सर्व धान खरेदी केंद्र बंद झाले आहे. केवळ १७ हजार शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली असून, अजूनही नोंदणी केलेल्या ५० हजारांवर शेतकऱ्यांकडून धान खरेदी होणे शिल्लक आहे. तर दुसरीकडे खरीप हंगामातील पेरणीची लगबग सुरू आहे. धान खरेदी केंद्र बंद झाल्याने ती पुन्हा सुरू होणार की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारने यंदा रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी केवळ १३ लाख क्विंटलची मर्यादा ठरवून दिल्याने जिल्ह्यातील ५० हजारांवर शेतकरी संकटात आले आहेत. धान खरेदीच्या मर्यादेत वाढ करून देण्यात यावी, यासाठी जिल्ह्यात मोर्चे, धरणे आंदोलन आणि निवेदनाचे सत्र सुरू होते. मात्र, महाविकास आघाडी सरकारच कोसळण्याची वेळ आल्याने आता जिल्ह्यातील शेतकरीदेखील संकटात आले आहेत. शासनाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला ठरवून दिलेली धान खरेदीची मर्यादा आठ दिवसांपूर्वीच पूर्ण झाल्याने सर्व धान खरेदी केंद्र बंद झाले आहे. केवळ १७ हजार शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली असून, अजूनही नोंदणी केलेल्या ५० हजारांवर शेतकऱ्यांकडून धान खरेदी होणे शिल्लक आहे. तर दुसरीकडे खरीप हंगामातील पेरणीची लगबग सुरू आहे. धान खरेदी केंद्र बंद झाल्याने ती पुन्हा सुरू होणार की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरमध्ये धान भरून ठेवला आहे. तर काही शेतकऱ्यांचा धान खरेदी केंद्राबाहेर ताडपत्र्या झाकून तसाच पडला आहे. पावसामुळे हा धान खराब होण्याची शक्यतासुध्दा नाकारता येत नाही. तर खासगी व्यापारी या संधीची वाट पाहत असून, शेतकऱ्यांकडून अंत्यत कमी दराने धानाची खरेदी करीत आहे. काही शेतकरी सावकार आणि नातेवाइकांपुढे हात पसरण्यापेक्षा कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करून मोकळे होत असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल धानामागे ८०० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटकासुध्दा शेतकऱ्यांना बसत आहे. एकीकडे निसर्ग ही शेतकऱ्यांना साथ देत नसताना शासनानेसुध्दा हात वर केल्याने त्यांची मोठी कोंडी झाल्याचे चित्र आहे. 

तर २६ लाख क्विंटल धान जाणार व्यापाऱ्यांच्या घशात - रब्बीतील धान खरेदीची मर्यादा वाढवून न मिळाल्यास ५० हजारांवर शेतकऱ्यांना जवळपास २६ लाख क्विंटल धान खासगी व्यापाऱ्यांना विक्री करावा लागणार आहे. बऱ्याच व्यापाऱ्यांनी यासाठी तयारी करून ठेवली असल्याची माहिती आहे. १२०० रुपये प्रति क्विंटलने धान खरेदी करायचा आणि तो गुजरातला पाठवायचा, असे नियोजनसुध्दा काही व्यापाऱ्यांनी केल्याची माहिती आहे. रब्बीतील धान खरिपात विकणार का ?n जिल्ह्यातील ५० हजारावर शेतकरी रब्बी धान विक्री करण्याच्या प्रतिक्षेत आहेत. पण सध्याची स्थिती पाहता धान खरेदीची मर्यादा वाढवून मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील धान खरीप हंगामात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

३० टक्के धान अद्यापही गोदामातखरीप आणि रब्बी हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानापैकी केवळ ७० टक्केच धानाची आतापर्यंत भरडाई झाली आहे. तर ३० टक्के धान गोदामातच पडून असल्याची माहिती आहे. खरेदीची मर्यादा वाढवून मिळाल्यास पुन्हा गोदामांची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. हमीभावापेक्षा कमी दराने धान खरेदी मग कारवाई का नाही ?धानाला शासनाने १९४० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. हमीभावापेक्षा कमी दराने धान खरेदी करू नये, असा नियम आहे. मात्र, यानंतर कमी दराने धान खरेदी सुरू असताना संबंधितावर कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर खरेदी केंद्राने खरेदी बंदचे आदेश दिल्यानंतरही ते धान खरेदी करीत असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार