शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
4
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
5
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
6
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
7
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
8
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
9
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
10
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
11
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
12
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
13
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
14
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
16
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
17
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
18
भारतात फुलटाइम स्टॉक ट्रेडर बनण्यासाठी जवळ किती पैसे असायला पाहिजे?
19
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
20
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला

शेतकऱ्यांनो कीटकनाशके फवारणीसाठी ड्रोन घ्या आणि ४ लाख अनुदान मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 17:37 IST

आजच करा अर्ज : केंद्र शासन पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कृषी क्षेत्रात मानवविरहित वायू यान अर्थात ड्रोनच्या वापरास मोठ्या प्रमाणात संधी आहे. कीटकनाशके, सूक्ष्म मूलद्रव्ये, खते फवारणी या बाबीव्यतिरिक्त कृषिक्षेत्राशी निगडित इतर कामांसाठीदेखील ड्रोनचा वापर करता येऊ शकतो. 

ड्रोन वापरामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात, वेळेत व श्रमात बचत होऊन रोजगारनिर्मिती होऊ शकते. त्यामुळे केंद्र शासन पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान या योजनेंतर्गत ड्रोन या घटकाचा समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे. सन २०२४- २५ साठी कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत १०० ड्रोन खरेदीसाठी महाराष्ट्र राज्यासाठी वार्षिक कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. ड्रोनसाठी शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था, तसेच कृषी व तत्सम पदवीधर लाभार्थी यांना अर्ज करता येणार आहे. 

कोणाला मिळेल अनुदान? शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था यांना ४० टक्के म्हणजे ४ लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. कृषी व तत्सम पदवीधर यांना ५० टक्के म्हणजे ५ लाख रुपये अनुदान दिले जाईल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, लहान व सीमांतिक महिला शेतकरी ५० टक्के म्हणजे ५ लाख रुपये, तर सर्वसा धारण शेतकरी यांना ४० टक्के म्हणजेच ४ लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. मार्गदर्शक सूचनेनुसार किसान ड्रोन व त्याचे संलग्न जोडणी साहित्याची मूळ, वास्तविक किमत असेल त्यापैकी जे कमी असेल ते अनुदान रक्कम देय राहील, ड्रोनसाठी ऑफलाइन अर्ज न करता इतर अवजाराप्रमाणे महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन प्रक्रिया राबविण्याबाबतची सूचना कृषी आयुक्तांनी दिली आहे. लाभार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर लॉगइन करून अर्ज करावेत, अशी सूचना कृषी विभागाने केली आहे.

महाडीबीटी पोर्टलवर करा अर्जकृषी यांत्रिकीकरण या घटकामध्ये ड्रोन हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यामुळे सन २०२४-२५ मध्ये ड्रोन हा घटक ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था व कृषी व तत्सम पदवीधर यांनी महाडीबीटी पोर्टलवर mahadbt.maharashtra.gov.in/Farmer या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत, तसेच अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

शेतकऱ्यांचा वेळ, पैसा वाचणारपिकांवर रोग आल्यास किंवा रोग होऊ नये म्हणून फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च येतो. फवारणी करण्यासाठी अतिशय मेहनत घ्यावी लागते. यामध्ये शेतकऱ्यांचा पैसा व वेळही खर्च होतो. शिवाय तीव्र स्वरूपाच्या औषधींमुळे जीविताचा धोका उद्भवू शकतो; परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना ड्रोनमुळे फवारणी करणे सोपे झाले आहे. ड्रोनची तांत्रिक माहिती घेऊन शेतकरी स्वतः फवारणी करू शकतील किवा तज्ज्ञा ड्रोन प्रशिक्षण चालकांकडून फवारणी करवून घेऊ शकतील.

टॅग्स :farmingशेतीgovernment schemeसरकारी योजनाFarmerशेतकरीgondiya-acगोंदिया