तिरोडा : शुक्रवारी ९ सप्टेंबरला गोंडमोहाडी येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला. यात धानपिकांवर लागणारे रोग, रोगांवरील औषधींचे नावे व किती प्रमाणात औषधी फवारणी करावी तसेच धानपिकांना कोणत्या प्रकारे रोग लागण्याची शक्यता असते व उपाययोजना यावर शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. यावेळी आ. विजय रहांगडाले यांनी शासनाच्या शेतीविषयक योजना व इतर योजनांचा लाभ घेण्यास जनतेस प्रवृत्त केले. अध्यक्षस्थानी आ. विजय रहांगडाले होते. मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी पोटदुखे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक चिंतामन रहांगडाले, भाजपा तालुका अध्यक्ष भाऊराव कठाणे, जिल्हा किसान आघाडीचे महामंत्री चतुर्भुज बिसेन व समस्त गावकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
शेतकरी मेळावा
By admin | Published: September 13, 2016 12:47 AM