तिरोडा : पावसाने दडी मारल्यामुळे जुलै महिना अर्धा लोटूनही रोवणी आटोपली नसल्याने शेतकऱ्यांनी चोरखमारा जलाशयाचे पाणी शेतीसाठी मिळावे अशी मागणी आमदार विजय रहांगडाले यांच्याकडे केली होती. त्यानुसार, आमदार रहांगडाले यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिले व सोमवारी (दि.१९) स्वत: चोरखमारा जलाशयातील पाणी सोडले. त्यामुळे परिरसरातील शेतकरी आनंदीत असून आता शेतीची कामे पुन्हा जोमात सुरू होणार आहेत.
शेतकऱ्यांसाठी पाणी सोडताना आमदार रहांगडाले यांच्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. चिंतामन रहांगडाले, सदस्य पिंटू रहांगडाले, भाजपा तालुका अध्यक्ष भाऊराव कठाणे, शहर अध्यक्ष स्वानंद पारधी, डी.आर.गिरीपुंजे, पं.स.सदस्य रमनिक सोयाम, सरपंच तुमेश्वरी बघेले, सेवा सहकारी अध्यक्ष तेजराम चव्हाण, न.प.चे उपाध्यक्ष सुनील पालांदूरकर, माजी जि.प.उपाध्यक्ष मदन पटले, बाला वहिले, विवेक ढोरे, हंसराज रहांगडाले, नरेंद्र बिसेन, डॉ. बिसेन, अशोक नंदेश्वर, अंकुश राठौड, योजीलाल ठाकरे, राजकुमार पटले, बिहारीलाल रहांगडाले, शामराव बिसेन प्रामुख्याने उपस्थित होते.