लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रब्बी हंगामातील धान खरेदी अद्यापही सुरु झाले नाही, दुसरीकडे खरीप हंगाम सुरु असून मळणी केलेले धान ठेवायचे कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे अवकाळी पावसाचे संकट आहे. यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे. गुरुवारी (दि.२०) अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयासमोर धान टाकून या विभागावर संताप व्यक्त केला. यामुळे काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले.
गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विकास महामंडळाच्या कार्यालयासमोरच नेऊन टाकले धान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 2:09 PM