शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

शेतकºयांची एसडीओ कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 9:08 PM

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी शेतकºयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकºयांना आर्थिक मदत व सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. या मागणीला घेऊन देवरी तालुक्यातील हजारो शेतकºयांनी गुरूवारी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. शेतकºयांच्या या विराट मोर्चाने पोलिसांसह प्रशासनाला चांगलाचा घाम ...

ठळक मुद्देदुष्काळ जाहीर करुन सरसकट कर्जमाफीची मागणी : मुख्यमंत्र्यांच्या नावे दिले निवेदनप्रमुख मागण्यादेवरी तालुका सरसकट दुष्काळग्रस्त घोषीत कराशेतकºयांचा सातबारा कोरा करुन पीक कर्ज व शेती अवजाराचे कर्ज माफ करा.खरीप हंगाम २०१५-१६ मध्ये दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आलेल्या तालुक्यातील ६८ गावांच्या शेतकºयांना पिकांची नुकसान भरपाई व पिक विमा दावेची रक्कम त्वरित देण्यात यावी.जनावरांसाठी चाºयाची व्यवस्था करण्यात यावी.प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला प्रती युनिट मागे १५ किलो अन्नधान्य देण्यात यावे.कर्जमाफी व पिक विम्याचे आॅफ लाईन अर्ज मंजूर करण्यात यावे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी शेतकºयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकºयांना आर्थिक मदत व सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. या मागणीला घेऊन देवरी तालुक्यातील हजारो शेतकºयांनी गुरूवारी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. शेतकºयांच्या या विराट मोर्चाने पोलिसांसह प्रशासनाला चांगलाचा घाम फोडला होता.कोणत्याही राजकीय पक्ष किंवा संघटनेच्या नेतृत्वात हा मोर्चा नव्हता तर सर्व शेतकºयांनीच या मोर्चाचे नेतृत्त्व केले हे विशेष. सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, पीक विम्याची रक्कम योग्य लाभार्थ्यांना मिळालीच पाहिजे, विमा कंपन्याकडून होणारी शेतकºयांची आर्थिक पिळवणूक बंद करा, मनरेगाची कामे त्वरीत सुरू करा, अशा घोषणा देत परसटोला देवरी येथून मोर्चाला सुरूवात झाली. त्यानंतर हा मोर्चा उपविभागीय कार्यालयाजवळ पोहचला. त्यानंतर देवरी तालुका शेतकरी व शेतमजूर संघटना व शेतकºयांच्या शिष्टमंडळातर्फे विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे उपविभागीय अधिकारी अशोक लटारे यांना दिले.शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष डॉ. चंद्रभान सोनबोईर, संघटक रियाज खान, सचिव महेंद्र मोहबंशी, सहसंघटक जीवनलाल सलामे, दिलीप अंबरवाडे, उत्तम मरकार, रामेश्वर पदाम, रंजित कसाम यांचा समावेश होता.या वेळी देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवडे, उपविभागीय कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, तहसीलदार विजय बोरुडे उपस्थित होते. देवरीचे ठाणेदार राजेश तटकरे यांच्या नेतृत्वात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हजारोंच्या संख्येत शेतकरी व शेतमजुरांनी काढलेल्या या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचे पुढारी तर नव्हेतच पण कोणत्याही पक्षाचे पोस्टर, बॅनर सुद्धा नव्हते हे विशेष. मोर्चा यशस्वी करण्यासाठी पुनाराम तुलावी, धन्नुलाल उके, कोमल रणबाकडा, लखन दुधकावरा, प्रल्हाद दुधनाग, अनिल वालद, धनसिंग उईके, मंदू बाकचोरिया, दिलीप सोनझाड, गणेश सोनबोईर, बाबुराव हिडको, अमरदास सोनबोईर, इमला बाळाबाग, रामजी हिरवाणी, दिलीप पडोले, लक्ष्मीशंकर मळकाम, पाटणकर, चिंता मडावी यांनी सहकार्य केले.आमदारांनी घेतली दखलतालुक्यातील शेतकºयांनी काढलेल्या मोर्चाची आमदार संजय पुराम यांनी दखल घेतली. शेतकºयांच्या मागण्यांची दखल घेत त्या मंजूर करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली आहे.क्षणचित्रेतालुक्यातील दुर्गम भागातील शेतकºयांचा समावेशदोनशेहून अधिक ट्रॅक्टरसह शेतकºयांचा सहभागस्वंयस्फूर्तपणे शेतकºयांचा सहभागशेतकºयांनीच केले नेतृत्त्वकुठलेही बॅनर, फलक नाही