लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पारंपरीक पद्धतीने होणाºया शेती सोबतच आता श्री पद्धतीचा वापर करुन शेतकºयांना त्याचा लाभ मिळणार आहे. कृषी विभागाच्या वतीने उन्नत शेती समृध्द शेतकरी या अभियानांतर्गत गोंदिया तालुक्यातील मंडळ कृषी अधिकारी कार्यालय दासगाव अंतर्गत शिवनी येथे घेण्यात आलेल्या प्रात्यक्षिकाचा लाभ २५ शेतकºयांना मिळणार आहे.कृषी विभागाच्या माध्यमातून उन्नत शेती समृध्द शेतकरी अभियानांतर्गत रोहिणी नक्षत्रात आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेतीचा प्रचार व प्रसार पंधरवाड्याच्या माध्यमातून शेती उत्पादनाला दुप्पट करण्याच्या हेतूने श्री पध्दत लागवडीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.कृषी सहायक रोशन लिल्हारे यांनी या मार्गदर्शनासह परिसरातील शेतकºयांना श्री पध्दतीचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न चालविले आहे.दिवसेंदिवस शेती उत्पादनासाठी खर्चाचे प्रमाण वाढत आहे. शेती उत्पादनासाठी आवश्यक साधन सामुग्रीच्या किंमतीचे भावही दुप्पट वाढले आहे.त्यामुळे शेतकरी आर्थिक ओझ्याखाली दबल्या गेला आहे. त्यामुळे शेतकºयांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी कृषी विभागाने आता उन्नत शेती समृध्द शेतकरी अभियान सन २०१७-१८ मध्ये प्रात्यक्षिकांद्वारे अभियानाची अंमलबजावणी केली आहे.शिवनी येथील प्रात्यक्षिकाच्या माध्यमाने निवड केलेल्या २५ शेतकºयांना त्यांच्या एका एकरातील क्षेत्राकरिता एचएमटी बियाणे देण्यात आले आहेत. तसेच एक एकर जमिनीला लागणारे औषध व खताची खरेदी ही शेतकºयांनी खासगीरित्या करुन बिल कार्यालयास सादर केल्यास त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येईल. कृषी विभागाचे हे अभियान शेतकºयांसाठी लाभदायक ठरेल, अशी अपेक्षा बाळगण्यात येत आहे.गोंदियाचे तालुका कृषी अधिकारी श्रृंगारे तसेच मंडळ कृषी अधिकारी पारधी यांच्या योग्य सहकार्याने व प्रयत्नातून शिवनी गावात तसेच तालुक्यातील सर्व गावांत श्री पध्दत यांत्रिकीकरण पध्दतीने रोवणीचे नियोजन केले आहे. त्यामुळे शेतकºयांच्या कार्याला गती मिळाली आहे.
तालुक्यातील शेतकºयांना मिळणार श्री पद्धतीचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 9:21 PM
पारंपरीक पद्धतीने होणाºया शेती सोबतच आता श्री पद्धतीचा वापर करुन शेतकºयांना त्याचा लाभ मिळणार आहे.
ठळक मुद्देकृषी विभागाचा उपक्रम : गोंदिया तालुक्यातील शिवनी येथील प्रयोग