शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

शेतकरी समृद्ध होईल

By admin | Published: May 28, 2017 12:10 AM

मागील अडीच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याच्या विकासाला गती मिळाली आहे.

पालकमंत्री बडोले : सलंगटोला येथे शिवार संवाद सभा लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : मागील अडीच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याच्या विकासाला गती मिळाली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. ११ हजार ९५ कोटी रूपयांची राज्यातील शेतकऱ्यांना रोख स्वरूपात मदत करण्यात आली आहे. प्रधानमंत्री सिंचन योजनेतून अपुर्णावस्थेतील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. शेतीशी संबंधित असलेल्या विविध योजनांचा लाभ शेतकरी बांधवांना देवून त्यांना समृध्द करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. सालेकसा तालुक्यातील सलंगटोला येथे २६ मे रोजी आयोजित शिवार संवाद सभेत उपस्थित शेतकऱ्यांना अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. संजय पुराम, भाजपाचे महामंत्री विरेंद्र अंजनकर, जि.प.समाज कल्याण समिती सभापती देवराज वडगाये, माजी जि.प.महिला व बाल कल्याण समिती सभापती सविता पुराम, माजी पं.स.सभापती बाबुलाल उपराडे, माजी पं.स.सदस्य संगीता शहारे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष बहेकार उपस्थित होते. पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, राज्य शासन शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यातील १ कोटी ३१ लाखशेतकऱ्यांची कर्जफेड शासनाने केली आहे. उर्वरीत ३१ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येईल. मागील अडीच वर्षात शेतकऱ्यांना पिक विम्याचे ६७३९ कोटी रूपये दिले आहे. २०१९ पर्यंत राज्य दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी केला आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पाणी टंचाईवर मात करण्यात येत आहे. शाश्वत सिंचनासाठी हे अभियान उपयुक्त ठरत आहे. या अभियानातून ५४४ कोटीची कामे लोकसहभागातून करण्यात आली आहे. १२ लाख ५१ हजार ७१३ हेक्टर क्षेत्रासाठी एकवेळच्या संरक्षीत सिंचनाची सुविधा यातून निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. आपला तलावांचा जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. हा गाळ खत म्हणून शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे. यावर्षी ४०० तलावांचा गाळ काढण्यात येत असून येत्या तीन वर्षात सर्वच १८०० तलावातील गाळ काढण्यात येईल. त्यामुळे होणाऱ्या पाणी साठ्यामुळे २५ टक्के सिंचन क्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यात युरियाचा काळाबाजार होणार नाही, शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला वीज जोडणी देण्यात येईल. शेती प्रकृतीची तपासणी करण्यासाठी माती परीक्षण करण्यात येत आहे. धान खरेदी केंद्रावर धान सडणार नाही, १०० एकर शेतीमध्ये गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक मदत करणार आहे. आ. पुराम म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्याय विविध योजनांची अंमलबजावणी योग्यप्रकारे होत आहे की नाही, याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी हा कार्यक्र म आयोजित करण्यात आला आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना, धडक सिंचन विहिरीचा कार्यक्र म, घरकूल योजना, वीज कनेक्शन यासह अनेक बाबींवर शासनाने काम केल्याचे सांगितले. तालुक्यातील १३ दुष्काळग्रस्त गावांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याची बाब उपस्थित शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. गाव परिसरात एका माकडाच्या उपद्रवामुळे परिसरातील ग्रामस्थ त्रस्त असून काही लोकांना या माकडाने चावा घेतल्यामुळे माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केल्यावर पालकमंत्र्यांनी उपवनसंरक्षकांना ही माहिती भ्रमणध्वनीवरु न देवून त्या उपद्रवी माकडाला ताबडतोब पकडण्याचे निर्देश दिले. मोतीराम भांडारकर या शेतकऱ्याचे १० एकर शेतीतील धान कुणीतरी अज्ञान व्यक्तीने पेटवून दिल्यामुळे शासनाने त्या व्यक्तीस त्वरीत मदत करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून दिल्या. सलंगटोला येथे आयोजित शिवार संवाद सभेला गावातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.