लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : येथील बनगाव येथील प्रभाग क्रमांक १ शिवाजीनगरात नागरिकांची वस्ती मागील ४० वर्षापासून वास्तव्यात आहे. परंतु शासनाद्वारे या नागरिकांकडून जमिनीचे हक्क संबंधी दंड वसूल करून सुद्धा नागरिकांना जमिनीचे हक्क प्रदान करण्यात आले नाही. उलट अतिक्रमण धारकांना संरक्षण देऊन जमिनीची मालकी देण्यात आली. या विरोधात १५ आॅगस्टपासून विश्वनाथ मानकर यांनी प्रशासनाला बेमुदत उपोषणाचे पत्र दिले आहे.बनगाव येथील नागरिक वस्ती अद्यापही गावठानमध्ये नाही. शासकीय रेकॉर्डप्रमाणे लोक वस्तीतील जमीन धारकांचे मालकी पट्टे देण्यासंबंधात दंड आकारणी करण्यात आली. परंतु अद्यापही नागरिकांना पट्टे संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. नागरिकांनी तहसील कार्यालय, तलाठी, देवरीचे उपविभागीय अधिकारी यांना पत्र व्यवहार करुन पट्टे मिळण्यासंदर्भात अनेक निवेदन सादर केले. परंतु पट्टे संदर्भात निर्णयाला प्रलंबित ठेवण्यात आले. त्यामुळे नागरिकांना जमीन हक्क मिळविण्यासाठी शासकीय कार्यालयांची पायपीट करावी लागत आहे.शिवाजीनगर येथील रस्ते मार्गावरील शासकीय जागेवर रस्ता अतिक्रमणीत करून शासकीय रिकार्डवर अनाधिकृतपणे फेरफार घेऊन शासकीय जागेची विल्हेवाट लावण्यात आली. यात बलाराम जियालाल अग्रवाल यांनी तलाठी नरुलकार यांच्याशी संगणमत करुन शासकीय जमीनीची विल्हेवाट लावल्याची तक्रार उपोषणकर्ते मानकर यांनी केली.शिवाजीनगर येथील नागरिकांना जमिनीचे पट्टे मिळविण्याकरिता तसेच शासकीय जागेवरील अतिक्रमीत रस्ता व जमिनीची विल्हेवाट लावणाºयावर कारवाई व्हावी यासाठी १५ आॅगस्टपासून मानकर यांनी उपोषणावर बसण्याचे पत्र प्रशासनाला दिले आहे. परंतु आतापर्यंत प्रशासनाने कसल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे त्यांचे उपोषण स्वातंत्र दिनापासून सुरू होणार असल्याचे दिसून येत आहे.
जमिनीच्या हक्कासाठी १५ आॅगस्टपासून उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 9:21 PM
येथील बनगाव येथील प्रभाग क्रमांक १ शिवाजीनगरात नागरिकांची वस्ती मागील ४० वर्षापासून वास्तव्यात आहे.
ठळक मुद्देबनगावच्या नागरिकांना हवी जमिनीची मालकी: अतिक्रमण दात्याला शासकीय संरक्षण