लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्थायी होण्याच्या आशेने मागील २०-२५ वर्षांपासून नगर परिषदेत कार्यरत सुमारे १८७ रोजंदारी कर्मचाºयांचे नशीब फळफळले असून त्यांच्या कष्टाचे फलीत मिळणार आहे. शैक्षणिक अर्हतेच्या आधारावर सुमारे ६५ कर्मचाºयांना स्थायी करण्याची प्रक्रिया येत्या १५ दिवसांत सुरू होणार असून उर्वरितांना मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आस्थापना खर्चाच्या आधारावर कायम केले जाणार आहे.नगर परिषदेतील रोजंदारी कर्मचाºयांना स्थायी करण्याच्या मागणीसाठी युनियनचे अध्यक्ष जहीर अहमद मागील कित्येक वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. सन २००६ पासून आमदार गोपालदास अग्रवाल यांनी अहमद यांच्या मागणीला घेऊन राज्य शासनाच्या स्तरावर आपले प्रयत्न सुरू ठेवले आहेत. रोजंदारी कर्मचाºयांच्या या मागणीला घेऊन शेवटी ७ तारखेला मुंबई मंत्रालयात नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी विशेष सभा बोलाविली होती.आमदार अग्रवाल, न.प.प्रशासन संचालक विरेंद्र सिंह, मुख्याधिकारी चंदन पाटील, कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अहमद यांच्यासह संबंधीत अधिकाºयांच्या उपस्थितीत रोजंदारी कर्मचाºयांचा विषय आमदार अग्रवाल यांनी मांडला. यावर जे रोजंदारी कर्मचारी १० व १२ वी उत्तीर्ण आहेत अशा सुमारे ६५ कर्मचाºयांना प्रथम टप्प्यात १५ दिवसांच्या आत स्थायी करण्याची कारवाई सुरू केली जाईल. तर उरलेल्या सुमारे १२२ कर्मचाºयांना आस्थापना खर्चाच्या आधारावर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून स्थायी करण्याची कारवाई करण्याचा निर्णय आमदार अग्रवाल यांच्या मागणीवरून घेण्यात आला. विशेष म्हणजे, आमदार अग्रवाल यांनी नगर परिषदेतील अधिकाºयांच्या अभावामुळे कारभार अव्यवस्थीत झाल्याचा मुद्दा बैठकीत मांडत संवर्गातील ४० पैकी ३३ पदे रिक्त असून त्यांना भरणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगीतले. गोंदिया शहराला ‘अमृत’ योजनेत समाविष्ट करण्यात आल्याने योजनेच्या क्रियान्वयनासाठी रिक्त पदे भरावी यासाठीही ते प्रयत्नरत असल्याचे सांगीतले.विशेष म्हणजे, कित्येक वर्षांपासून आपली सेवा देत रोजंदारी कर्मचारी फक्त स्थायी होण्याची आशा बाळगून आहेत. त्यांच्या आशेची पूर्तता व्हावी यासाठी रोजंदारी कर्मचारी युनियनच्या माध्यमातून त्यांचा लढा मागील २०-२५ वर्षापासून सुरू आहे. मात्र त्यांच्या या मागणीकडे कुणीही लक्ष घातले नाही. परिणामी कित्येकांची वयोमर्यादा आता होत आली आहे. अशात मात्र आमदार गोपालदास अग्रवाल यांनी रोजंदारी कर्मचाºयांचे भविष्य सुधारावे यासाठी पाऊल उचलून त्यांची मागणी मंत्रालयापर्यंत पोहचविली. तसेच रोजंदारी कर्मचारी स्थायी व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. परिणामी मंत्रालयातील विशेष बैठकीत आमदार अग्रवाल यांच्या मागणीवरून रोजंदारी कर्मचाºयांच्या स्थायी होण्याचा विषय मार्गी लागला.अग्निशमन विभागाचा विषय गाजलाशहरातील हॉटल बिंजल प्लाजामधील अग्निकांडात मृत्यूमुखी पडलेल्या ७ जणांच्या घटनेमुळे या बैठकीत शहरातील अग्निशमन व्यवस्थेचा विषय गाजला. अग्निशमन व्यवस्थेतील या सुधारासाठी अग्निशमन विभागात कर्मचाºयांची भर्ती करावी तसेच वाढती लोकसंख्या लक्षात घेता विभाग सुसज्ज करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार अग्रवाल यांनी सांगीतले. यासाठी अतिरीक्त पदांची निर्मिती करून कर्मचारी संख्या वाढविण्याची मागणी त्यांनी केली. यावर प्रधान सचिव म्हैसकर यांनी सर्व महत्वपूर्ण विषयांवर त्वरीत कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
रोजंदारी कर्मचाºयांचे नशीब फळफळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 10:22 PM
स्थायी होण्याच्या आशेने मागील २०-२५ वर्षांपासून नगर परिषदेत कार्यरत सुमारे १८७ रोजंदारी कर्मचाºयांचे नशीब फळफळले असून त्यांच्या कष्टाचे फलीत मिळणार आहे.
ठळक मुद्दे१५ दिवसांत कायम करण्याची कार्यवाही : विशेष बैठकीत आमदार अग्रवाल यांची मागणी