नरेश रहिले।आॅनलाईन लोकमतगोंदिया : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियांनांर्गत शौचालय तयार करण्यात अग्रेससर राहणाऱ्या जिल्ह्यातील १५ शाळांची फाईव्ह स्टार ग्रेड मध्ये निवड करण्यात आली आहे. शाळांच्या स्थितीवरून उत्कृष्ट शाळांना राज्याकडून ग्रेड दिली जाणार आहे.केंद्र सरकारच्या स्वच्छ-सुंदर (स्मार्ट शहर) सोबत स्वच्छ सुंदर व मूलभूत सुविधा असलेल्या शाळा उभारण्याचा शासनाचा मानस आहे. या योजनेंतर्गत स्वच्छ शाळा पुरस्कार योजना सरकारकडून राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात सन २०१७-१८ साठी स्वच्छ शाळा पुरस्कारासाठी २६८ शाळांनी प्रस्ताव सादर केले होते. यातील १५ शाळांची ‘फाईव्ह स्टार’ म्हणून निवड करण्यात आली आहे. तर ७२ शाळा फोर स्टारमध्ये आणि १७६ शाळांची थ्री स्टार म्हणून निवड करण्यात आली.निवड झालेल्या या शाळांचे मुल्यांकन जिल्हास्तरीय चमूद्वारे ३१ डिसेंबरपर्यंत करण्यात येणार आहे. ज्या शाळांची ‘फाईव्ह स्टार’साठी निवड करण्यात आली. त्यात अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २, देवरी ३, गोंदिया २, सालेकसा २ तर तिरोडा तालुक्यातील ६ शाळांचा समावेश आहे. सडक -अर्जुनी, आमगाव व गोरेगाव तालुक्यातील एकाही शाळेचा समावेश नाही.निवड केलेल्या शाळांनी १०० पैकी ५० टक्यापेक्षा अधिक गुण मिळविले आहे. जि.प.शिक्षण विभागानुसार स्वच्छ शाळा पुरस्कारासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज केले होते. मुल्यांकनही आॅनलाईन होणार आहे. जिल्ह्यातील ४८ शाळांची पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे.आॅनलाईन होणार मुल्यांकनशाळांना फाईव्ह स्टार, फोर स्टार व थ्री स्टार ग्रेड त्यांच्या स्थितीनुसार दिला जाणार आहे. फाईव्ह स्टार शाळोत भरपूर पाणी, स्वच्छता, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, स्वच्छतेसाठी हँडवॉश स्टेशन ज्यात नेहमी पाणी उपलब्ध असेल, लिक्वीड, साबन उपलब्ध असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त कचरापेटी, कचरा निर्मूलनाची व्यवस्था, स्वच्छतेची सुविधा ठेवण्याची जबाबदारी सर्वांची राहील.या शाळा ‘फाईव्ह स्टार’अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कनेरी येथील डॉ. आर. के. हायस्कूल, दाभनाची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देवरी रेहली येथील जिल्हा परिषद शाळा, म्हैसुली ची सोनियाबाई डी. आश्रम स्कूल, गोंदियाच्या नागरा येथील अनुसृचित जमाती व नवबौद्ध मुलांचे शासकीय निवासी स्कूल, कटंगीकला येथील अॅक्यूट पब्लिक स्कूल, सालेकसा तालुक्यातील जमाकुडो येथील शासकीय सेकंडरी आश्रम शाळा, भजेपार येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, तिरोडा येथील एससी एण्ड नवबौद्ध गर्ल्स स्कूल, गुमाधावडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मेरिटोरियस पब्लिक स्कूल, खैरलांजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सोनेगाव येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा व परसवाडा येथील जिल्हा परिषद शाळेचा समावेश आहे.
‘फाईव्ह स्टार’ मध्ये जिल्ह्यातील १५ शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 10:28 PM
नरेश रहिले।आॅनलाईन लोकमतगोंदिया : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियांनांर्गत शौचालय तयार करण्यात अग्रेससर राहणाऱ्या जिल्ह्यातील १५ शाळांची फाईव्ह स्टार ग्रेड मध्ये निवड करण्यात आली आहे. शाळांच्या स्थितीवरून उत्कृष्ट शाळांना राज्याकडून ग्रेड दिली जाणार आहे.केंद्र सरकारच्या स्वच्छ-सुंदर (स्मार्ट शहर) सोबत स्वच्छ सुंदर व मूलभूत सुविधा असलेल्या शाळा उभारण्याचा शासनाचा मानस आहे. या ...
ठळक मुद्दे१७५ थ्री स्टार शाळा : स्वच्छ भारत अभियानातंर्गत निवड