लोकमत न्यूज नेटवर्क सडक-अर्जुनी: सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यात प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या पक्षाच्या प्रचार करीत असतात; परंतु सोशल माध्यमावर एक बातमी व्हायरल होत आहे. प्रचार सभेत सुधीर साळीनामक कार्यकर्त्याकडून कुणबी समाजाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करत कुणबी समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. यामुळे कुणबी समाजबांधवांच्या भावना दुखावल्या असून सुधीर साळी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कुणबी समाजसंघटनेने केली आहे.
यासंबंधची निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी यांच्या नावे तहसीलदारांना देण्यात आले. निवेदनातून सुनील साळी यांच्या वक्तव्यामुळे आम्हा सकल कुणबी समाजाच्या भावना दुखावल्या आहे. अशा वक्तव्यामुळे समाजातील व्यक्तीच्या हातातून काही अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तरीपण शासनाला विनंती आहे की, विकृत व्यक्तीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा कुणबी समाजात उद्रेक होऊ शकते. त्यामुळे साळी यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष अनिल मुनीश्वर, उपाध्यक्ष तुलसीदास शिवणकर, सचिव दिनेश हुकरे, देवचंद तरोणे, माधव तरोणे, अंकित भेंडारकर, किशोर शेंडे, देवानंद कोरे, निखिल मुनीश्वर, अरविंद मेंढे, प्रेमलाल हत्तीमारे, धनीराम ब्राह्मणकर व समाजबांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.