गोंदिया शहर पोलिसांनी १५ मे रोजी सायंकाळी ६ वाजता जयस्तंभ चौक गोंदिया येथे विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर पोलीस शिपाई किरसान यांनी कारवाई केली. रावणवाडी पोलिसांनी सायंकाळी ५ वाजता त्रिमूर्ती चौकात येथे विनाकारण फिरणाऱ्यांवर दोघांवर कारवाई केली. रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कामठा येथे १५ मे रोजी दुपारी ३.३० वाजेदरम्यान विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस शिपाई संजय पुरणलाल कटरे यांनी कारवाई केली आहे. रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कुडवा नाका येथे विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस हवालदार राजेश सुखराम भुरे यांनी कारवाई केली आहे. संबंधित पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम १८८,२६९ सहकलम ५१ ब आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ सहकलम ११ महाराष्ट्र कोविड विनियम २०२० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
विनाकारण फिरणाऱ्यांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 4:27 AM