ठाणा : ठाणाच्या बसस्थानकापासून ते ठाणाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंतचा रस्ता खड्ड्यात गेला आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणाऱ्या रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या रस्त्याची डागडुजी करावी अन्यथा या रस्त्यावर आणखी खड्डे खोदण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका आमगाव शाखेने सार्वजनिक बांधकाम विभाग गोंदिया यांना दिले आहे.
या रस्त्याचे काम करताना अनेकदा निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले. यासंदर्भात आमगाव येथील उपअभियंता कार्यालयाला सूचना देण्यात आली; परंतु त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. १० वर्षांसाठी तयार करण्यात येणारा रस्ता दोन वर्षांतच जीर्ण होऊन जातो. हा रस्ता सात दिवसांत पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तालुकाध्यक्ष शुभम कावळे, उपाध्यक्ष राजेश सोनवाने, नितेश महारवाडे, प्रशांत देशकर, गणेश मेश्राम, दिनेश मेश्राम, वीरेंद्र बनकर, प्रतीक बोपचे, इसुलाल निनावे, योगेश मेश्राम, आकाश पारधी, अनिल आगरे, धर्मराज चनाप, प्रदीप बेंदवार, जितेंद्र भेलावे, सागर बनकर, अंकुश बनकर, राध्येशाम पारधी, मुकेश रक्तासिंगे, विकास देशकर, चंद्रशेखर भेलावे, भारत नागरिकर, योगेश मेहर, प्रेम जोशी, यादोराव केवट, देवा बनकर, नंदू येळे, पिंटू बनकर, राकेश बागळे, याेगेश निनावे यांनी दिला आहे.