शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

नवीन फायर स्टेशनचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 12:02 AM

शहरातील अग्निशमन व्यवस्था बळकट करण्यासाठी अतिरीक्त फायर स्टेशन मंजूर करण्यात यावे. अशी मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी विधानसभेत केली. शिवाय अग्निशमन विभागातील रिक्त पदे भरुन त्यात किमान २० टक्के पद अनुकंपाधारकांची भरण्यात यावी, अशी मागणीही आमदार अग्रवाल यांनी केली होती. त्याला शासनाने हिरवी झेंडी दिली आहे.

ठळक मुद्दे२५ टक्के अनुकंपाधारकांचा समावेश : रिंग रोडवर जागेला मिळाली मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील अग्निशमन व्यवस्था बळकट करण्यासाठी अतिरीक्त फायर स्टेशन मंजूर करण्यात यावे. अशी मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी विधानसभेत केली. शिवाय अग्निशमन विभागातील रिक्त पदे भरुन त्यात किमान २० टक्के पद अनुकंपाधारकांची भरण्यात यावी, अशी मागणीही आमदार अग्रवाल यांनी केली होती. त्याला शासनाने हिरवी झेंडी दिली आहे.आमदार अग्रवाल यांनी, विधानसभेत गोंदिया तालुका आता जिल्हा बनला असून शहरातील लोकसंख्ये सातत्याने वाढ होत आहे. मात्र त्या दृष्टीने अग्निशमन व्यवस्था बळकट करण्यासाठी पायाभूत सुविधांचा अभाव होता. डिसेंबर २०१६ मध्ये घडलेल्या घटनेत सात जणांना जीव गमवावा लागला. तर काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेत बाजारातील १५-१६ दुकाने जळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. अशात मात्र अग्शिमन व्यवस्था आगीवर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली. अग्निशमन विभागात कित्येक पदे रिक्त आहेत. जे कर्मचारी आहेत ते अप्रशिक्षीत आहेत. वाहनांवर आधुनिक अग्निशमन यंत्राची कमतरता आहे. त्यात शहरातील रेलटोली-रामनगर भागात अतिरीक्त फायर स्टेशन बनवायचे असून नगर विकास विभागाकडे नगर परिषद जागेच्या मंजुरीचे आदेश अप्राप्त आहेत. एकीकडे कर्मचाऱ्यांची कमतरता असताना नगर परिषद अनुकंपाधारक मोठ्या संख्येत असून नोकरीची वाट बघत त्यांची वयोमर्यादा बाद होत आहे.अशात नवीन फायर स्टेशनला मंजुरी देण्यात यावी. त्यात किमान २० टक्के अनुकंपाधारकांना घेण्यात यावे, अशी मागणी आमदार अग्रवाल यांनी केली.मुख्यमंत्र्यांनी केली घोषणाआमदार अग्रवाल यांनी केलेल्या सर्वच मागण्यांना मान्य करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन फायर स्टेशनसाठी नगर परिषदेच्या जागेला मंजुरी देण्याची घोषणा केली. सोबतच अग्निशमन विभागात भर्ती मध्ये किमान २५ टक्के अनुकंपाधारकांना घेण्याचे आदेशही त्यांनी दिले. विशेष म्हणजे, नगर परिषद जागेवर नवीन अग्निशमन केंद्र बनविण्यासाठी नगर विकास विभागाचे अपेक्षीत आदेशही नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील यांना मिळाले आहे.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल