शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

युवकांच्या श्रमदानाने सौंदर्यीकरणात भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 10:27 PM

गाव स्वच्छ व सुंदर असावे हे मुलमंत्र आत्मसात करुन येथील नागरिकांनी नगर पंचायत उपाध्यक्ष आशिष बारेवार यांच्या पुढाकाराने स्थानिक पवन तलावाचे सौंदर्यीकरण केले.

ठळक मुद्देपर्यटनस्थळाचा दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न : गोरेगावच्या युवकांचा आदर्श

दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : गाव स्वच्छ व सुंदर असावे हे मुलमंत्र आत्मसात करुन येथील नागरिकांनी नगर पंचायत उपाध्यक्ष आशिष बारेवार यांच्या पुढाकाराने स्थानिक पवन तलावाचे सौंदर्यीकरण केले. दर रविवारी येथील नागरिक पवन तलाव येथे श्रमदान करतात. त्यामुळे दिवसेंदिवस या तलावाच्या सौंदर्यीकरणात भर पडत आहे.प्राप्त माहितीनुसार २ आॅक्टोबर पासून पवन तलाव येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. एक महिन्याच्या कमी कालावधीत येथील नागरिकांना तलावाचा चेहरामोहराच बदलून टाकला. दर रविवारी आशीष बारेवार यांच्या संकल्पनेतून इथे स्वच्छता अभियान राबविण्यात येते. गावकरी हातात झाडू घेवून येथे साफसफाई करतात. त्यामुळे येथील पाण्याच्या शुध्दीकरणातही भर पडली आहे.गोरेगावात पवन तलाव हे मध्यभागी वसलेले आहे. बºयाच वर्षापासून या तलावाचे खोलीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे तलाव समतल झाले असून पाणी साठवण क्षमताही कमी झाली आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात तलावात पाणी राहत नाही. तलावाची साफसफाई होत नसल्यामुळे येथील पाणी प्रदूषित झाले होते.या सर्व बाबीला आशिष यांनी हेरले व त्यांच्या कल्पनेतून पवन तलावाला जीवदान देण्यासाठी युवा शक्ती स्पोर्ट, विश्व गायत्री परिवार व गोरेगाव नगर पंचायत प्रशासनाने हातात झाडू घेत पवन तलावाला नंदनवन बनविण्याचा संकल्प केला. यासाठी नमन जैन, साकुरे गुरुजी, प्रणय वैद्य, विकास बारेवार, हिमांशु बारेवार, प्रविण बारेवार, यश कुंडजवार, दीपक रहांगडाले, अमोल भेंडारकर, संजय घासले व गावकरी यांनी पवन तलावाचे सौंदर्यीकरण करण्याचे काम सुरू केले. दर रविवारी येथे नागरिक स्वच्छतेसाठी पोहचू लागले. स्वच्छता अभियान राबवू लागले. तलावाचे पाणी साठवण क्षमता वाढावी, पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त व्हावा, म्हणून इथे वृक्षारोपण करण्यात आले. झाडांना सुरक्षा देण्यासाठी जुन्या टायरचा वापर करण्यात आला. त्या टायरला रंगाने रंगविण्यात आले. टायरच्या मध्यभागी खड्डा खोदून झाडाचे रोपवन करण्यात आले. तर टायरचे कठडे तयार करुन जनावरांपासून त्या झाडाचे संरक्षण करण्यात आले.पवन तलावात विद्युत व नागरिकांना बसण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी येथे नागरिक येतात. या तलावाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळेल अशी आशा गावकºयांना आहे. त्यासाठी इंजि. बारेवार परिश्रम घेत आहेत.