शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

मूर्त्यांना ‘फायनल टच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 9:10 PM

मांगल्याची देवता गणरायांच्या स्थापनेला आता काही तासांचा अवधी उरला आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांची धावपळ वाढली असून तयारी पूर्ण करण्यासाठी त्यांची लगबग सुरू आहे.

ठळक मुद्देआज गणरायांचे आगमन : गणेशोत्सव मंडळांची लगबग, स्वागतासाठी सर्वच उत्सुक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मांगल्याची देवता गणरायांच्या स्थापनेला आता काही तासांचा अवधी उरला आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांची धावपळ वाढली असून तयारी पूर्ण करण्यासाठी त्यांची लगबग सुरू आहे. तर काही मोठ्या मंडळांच्या मूर्त्यांचे शहरात आगमन सुरू झाले आहे. विशेष म्हणजे वेळेवर मूर्त्यांचे आॅर्डर पूर्ण करण्यासाठी मूर्तिकारांचे रात्रीला जागून काम सुरू असून ते मूर्त्यांना ‘फायनल टच’ देत असल्याचे चित्र होते.शुक्रवारपासून (दि.२५) गणेशोत्सवाला प्रारंभ होतोय. शहरात मोठ्या प्रमाणात खाजगी व सार्वजनिक गणपतींची स्थापना केली जाते. गणेशोत्सवाचे हे १० दिवस नवचैतन्याने बहरलेले असतात. यामुळेच गोंदिया शहरातील गणेशोत्सवाची जिल्हाच काय लगतच्या छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यांतही ख्याती आहे. मात्र आता गणरायांच्या आगमनाला काहीच तास शिल्लक असल्याने शहरात एकच गर्दी व सर्वांना लगबग दिसून येत आहे.शहरातील काही मंडळ गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे देखावे व मुर्ती या मोठ्या बजेटच्या राहत असल्याने ही सर्व कामे आटोपण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते धावपळ करीत असताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे काही मंडळांच्या मुर्ती छत्तीसगड राज्यात तयार होतात. त्यामुळे गणेश मंडळ आपल्या मुर्ती आणण्यासाठी रवाना झाले असून मुर्त्यांचे आगमन सुरू झाले आहे. तर मंडपांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी कारागिर दिवसरात्र एक करून कामाला लागले आहेत.गणराज येणार असल्याने महिला वर्गही घराच्या साफसफाई व डेकोरेशनला लागल्या आहे. तसेच गणरायांना १० दिवस कोणता नैवेद्य दाखवायचा व मोदकांच्या तयारीत व्यस्त दिसून येत आहे. विशेष म्हणजे या सर्व लगबगीत मुर्तीकारही मागे नाही. त्यांनी घेतलेले मुर्तींचे आॅर्डर पूर्ण करण्यासाठी मुर्तीकार आपल्या परिवारासह डोळ््यात तेल घालून काम करीत आहेत. तसेच आपल्या मुर्तींची तयारी पूर्ण करवून घेण्यासाठी मंडळांचे कार्यकर्ते मूर्तिकारांकडे तळ ठोकून बसले आहेत. मुर्तीकारांचे बस्तान सध्या येथील सिव्हील लाईन्स परिसरात असल्याने सिव्हील लाईन्स परिसर आतापासूनच गजबजून गेला आहे.असा आहे स्थापनेचा मुहूर्तगणरायांच्या स्थापनेसाठी शुभ मुहूतार्ची गरज नसते असे म्हटले जाते. तरिही पंचांगानुसार, स्थापनेसाठी सकाळी ७.३० ते १०.३० वाजता व दुपारी १२ ते १.३० वाजताचा मुहूर्त शुभ आहे. तसेच रात्री ९ वाजतापासून १०.३० वाजताचा मुहूर्त असल्याचे पंडीत गोविंद शर्मा यांनी सांगीतलेपुणे व जबलपूरच्या मूर्तीलगतच्या मध्यप्रदेश राज्यातील जबलपूर येथून दरवर्षी मोठ्या प्रमाणात मुर्ती विक्रीसाठी शहरात येतात. त्यानुसार यंदाही या मुर्ती शहरात आल्या आहेत. विशेष म्हणजे पुणे येथूनही मुर्ती शहरात विक्रीसाठी आल्या आहेत. वेगवेगळ््या प्रकारच्या लहान-मोठ्या मुर्ती घेऊन विक्रेते नेहरू चौक, आंबेडकर चौक व जयस्ंतभ चौकात दिसून येत आहेत. तर मोठ्या संख्येत नागरीक या मुर्तींची खरेदी करीत असल्याने येथे गर्दी होते.साहित्यांच्या दुकानांत गर्दीगजाननाला सजविण्यासाठी लागणाºया साहीत्यांच्या दुकानांनी बाजारपेठ सज्ज आहे. या दुकानांत सध्या आपल्या घरच्या मुर्तीसाठी तसेच सार्वजनिक मंडळांच्या मुर्तींच्या साहीत्यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी दिसून येत आहे. गणेशोत्सव काही तासांवर असल्याने सर्वच आतापासून खरेदीला लागले असून यामुळे शहर गजबजून गेले आहे.