शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

अखेर ‘कृषी जैवतंत्रज्ञान’ला लवकरच प्राध्यापक मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 10:11 PM

येथील वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाला दोन वर्षांपासून असलेली प्राध्यापकांची प्रतीक्षा संपणार आहे. येत्या महिनाभरात तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मुलाखती घेऊन नेमणुका केल्या जातील, अशी स्पष्टोक्ती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी दिली.

ठळक मुद्देकुलगुरू भाले : महिनाभरात नेमणुका, विद्यार्थी प्रवेशक्षमता ‘जैसे थे’

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाला दोन वर्षांपासून असलेली प्राध्यापकांची प्रतीक्षा संपणार आहे. येत्या महिनाभरात तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मुलाखती घेऊन नेमणुका केल्या जातील, अशी स्पष्टोक्ती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी दिली.विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीच्या बैठकीसाठी आले असता त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय संपूर्ण विदर्भाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यासाठीच येथे तज्ज्ञ प्राध्यापक असण्याची गरज आहे. परंतु, सध्या विद्यापीठाने येथे अकरा महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यामुळेच प्राध्यापक नेमणुकीची प्रक्रिया विद्यापीठाने सुरू केली आहे. महिनाभरात मुलाखती घेऊन नेमणुका होणार आहे. प्रवेशक्षमता वाढविण्याचा प्रस्ताव विद्यापीठाकडे आला आहे का, या प्रश्नावर कुलगुरू डॉ. भाले म्हणाले, सध्याच तसा काही प्रस्ताव नाही. प्रवेश क्षमता वाढविण्याचा सध्याच काही विचार नाही. अभ्यासक्रम गेल्यावर्षी प्रमाणेच सुरू राहतील.शास्त्रज्ञांनो, बोंडअळी रोखाकृषी विद्यापीठातर्फे येथील कृषी विज्ञान केंद्रात सोमवारी विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीची बैठक झाली. यात कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी विदर्भातील कृषी शास्त्रज्ञांकडून बोंडअळीबाबत आढावा घेतला. गेल्या वर्षी जिल्ह्यात साडेतीन लाख हेक्टरवर बोंडअळीने नुकसान झाल्याची माहिती यावेळी कुलगुरूंपुढे ठेवण्यात आली. या हंगामात ठोस पावले उचलून विदर्भातून बोंडअळीला हद्दपार करा, असे निर्देश कुलगुरूंनी शास्त्रज्ञांना दिले.