शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अखेर झाली तंमुस अध्यक्षाची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 11:43 PM

येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष पदाच्या निवड सभेत दोन गटांच्या चर्चेअंती गुप्तमतदान पद्धतीने रविवारी (दि.३१) रात्री उशिरापर्यंत निवडणूक घेण्यात आली.

ठळक मुद्दे१२६६ ग्रामस्थांचे मतदान गुप्तपद्धतीने : प्रमोद पाऊलझगडे विजयी, उशिरापर्यंत चालली प्रक्रिया

आॅनलाईन लोकमतबोंडगावदेवी : येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष पदाच्या निवड सभेत दोन गटांच्या चर्चेअंती गुप्तमतदान पद्धतीने रविवारी (दि.३१) रात्री उशिरापर्यंत निवडणूक घेण्यात आली. रात्री ११.३० वाजता मतमोजणी प्रक्रिया संपल्यानंतर सभाध्यक्षांनी प्रमोद पाऊलझगडे बहुमताने विजयी झाल्याचे घोषित केले.येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदाची निवड ४ महिन्यांपूर्वी घेण्यात आली होती. त्यात त्यावेळच्या ग्रामसभा अध्यक्षांनी प्रमोद पाऊलझगडे यांची निवड झाल्याचे घोषित केले होते. त्याचवेळी शर्यतीमधील अध्यक्षपदाचे उमेदवार पुंडलिक भैसारे यांनी आक्षेप घेवून चौकशीची मागणी केली होती. त्यामुळे सदर निवड वाद्यांत आली होती. पंचायत समितीच्या वतीने प्रकरणाची शहनिशा करुन ३० आॅगस्ट २०१७ रोजी घेण्यात आलेली तंमुस अध्यक्षाची निवड शासन निर्णयाप्रमाणे घेण्यात आली नसल्यामुळे झालेली निवड वैध कसे म्हणता येईल, असा अभिप्राय गट विकास अधिकारी नारायण जमईवार यांनी आपल्या ११ आॅक्टोबर २०१७ च्या चौकशी अहवालात नमूद केले होते. त्याचप्रमाणे जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांनी १४ नोव्हेंबर २०१७ च्या पत्रात ग्रामपंचायत बोंडगावदेवी येथील तंमुस अध्यक्षाची निवड नियमानुसार झालेली नसल्यामुळे ग्रामसभा बोलावून शासन निर्णयाप्रमाणे निवडणूक घ्यावी, असे निर्देश दिले होते.वरिष्ठांच्या आदेशान्वये अखेर ग्रामपंचायतला नव्याने तंमुस अध्यक्षाची निवड करण्यासाठी विशेष ग्रामसभा घ्यावी लागली. ३० डिसेंबरला बाजार चौकात विशेष ग्रामसभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच राधेशाम झोळे होते. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या १/३ सभासद निवड करणे, या एकमेव विषयावर ग्रामसभा घेण्यात आली. सभेला गावातील १४२२ महिला-पुरुष उपस्थित होते. तसेच विशेष निरीक्षक म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अनुपकुमार भावे उपस्थित होते. सभेत शांतता रहावी म्हणून पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, सहायक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.सभेत प्रमोद पाऊलझगडे व पुंडलिक भैसारे या दोघांची नावे समोर आली. शेवटपर्यंत दोघेही तटस्थ असल्याने ग्रामसभा अध्यक्षांनी हातवर करुन मतदान घेण्याची तयारी दर्शविली. त्यावर पुंडलिक भैसारे यांच्या समर्थकांनी आक्षेप घेवून लेखी निवेदनातून लोकशाही पद्धतीने गुप्त मतदान घेवून निवड करावी, अशी भूमिका घेतली. चर्चेअंती गुप्त मतदान प्रक्रियेला तयार झाल्याने निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.ग्रामसभेला नोंद झालेल्या ग्रामस्थांपैकी १२६६ गावकºयांनी मतदान केले. यात प्रमोद पाऊलझगडे यांना ८३० मते तर पुंडलिक भैसारे यांना ४०८ मते पडली. २८ मते अवैध ठरली. सभाध्यक्षांनी प्रमोद पाऊलझगडे यांचा विजय झाल्याचे जाहीर केले. निवड प्रक्रिया रात्री ११.३० वाजेपर्यंत चालली.पाऊलझगडे यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करू विजयोत्सव साजरा केला. भैसारे यांच्या समर्थकांनी त्यांना बाहेर येवू देताच पुष्पहार घालून अपेक्षेपेक्षा जास्त मतदान घेतल्याने त्यांचे स्वागत केले. भैसारे यांच्या समर्थकांनी गुप्त मतदान झाल्याने समाधान व्यक्त केले. निवडणूक प्रक्रियेसाठी सरपंच राधेश्याम झोळे, ग्रामसेवक ब्राम्हणकर, निरीक्षक अनुपकुमार भावे व कर्मचाºयांनी सहकार्य केले.