शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कल्याणकारी योजनेतून आर्थिक सक्षमीकरण

By admin | Published: February 26, 2016 2:04 AM

केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनेच्या माध्यमातून जनतेचे आर्थिक सक्षमीकरणासोबत ...

जि.प. अध्यक्ष उषा मेंढे : विशेष जनजागृती कार्यक्रमगोंदिया : केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनेच्या माध्यमातून जनतेचे आर्थिक सक्षमीकरणासोबत विकास साध्य होऊ शकतो म्हणून लोकांना पंतप्रधान सामाजिक सुरक्षा योजना, मुद्रा योजना तसेच कौशल्य विकास योजनेचा लाभ घ्यावा, असे मत जिल्हा परिषद अध्यक्षा उषाताई मेंढे यांनी व्यक्त केले.भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रीय प्रचार कार्यालय नागपूरच्यावतीने आमगाव येथील पंचायत समितीच्या प्रांगणात आयोजित विशेष जनजागृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या.विशेष जनजागृती कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, पंचायत समितीच्या सभापती हेमलता डोये, तहसीलदार राजीव शक्करवार, गटविकास अधिकारी सी.जी. मून, क्षेत्रीय प्रचार अधिकारी मनोज सोनोने उपस्थित होते.मेंढे म्हणाल्या, प्रधानमंत्री जनधन योजनेसोबतच बेटी बचाव बेटी पढाओ या सारख्या सामाजिक सुरक्षा प्रदान करणाऱ्या योजनांची गरज आहे. इतर योजनेच्या माध्यमातून लोकांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत होणार असून या योजनांचा लाभ जनतेने घेण्याचे आवाहन त्यांनी केले.याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे म्हणाले की, केंद्र सरकारच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक संकटातून सावरण्याचा आणि सामाजिकदृष्ट्या आधार देण्याचा प्रयत्न केला जात आहे. जनतेने केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा तसेच स्वच्छ भारत करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी आमगाव पंचायत समितीच्या सभापती हेमलता डोये तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे देशमुख यांनी आपले विचार व्यक्त केले. बँक आॅफ इंडियाच्या प्राजक्ता बारई यांनी मुद्रा आणि जनधन योजनेबाबत मार्गदर्शन केले. गोंदियाच्या भारत संचार निगमचे संदीप सोनावने यांनी डिजीटल इंडिया या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी आमगावच्या गौर यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ याविषयी मार्गदर्शन केले.क्षेत्रीय प्रचार कार्यालय नागपूरच्यावतीने आयोजित या विशेष जनजागृती कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामीण रुग्णालय आमगावच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. बँक आॅफ इंडिया, एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योग केंद्र गोंदिया, नेहरु युवा केंद्र, भारत मिशन जि.प. गोंदिया यांच्यावतीने ते राबवित असलेल्या योजनांची माहिती देणारे स्टॉलस लावण्यात आले होते.यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धातील सहभागींना पुरस्कार देण्यात आले. विशेष जनजागृती कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी आमगावात रॅली काढण्यात आली. यावेळी क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे अधिकारी फनीकुमार, रामचंद्र सोनसळे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)