लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील मुख्य बाजार परिसरातील उत्तम स्टोर्स या कापड दुकानाला रविवारी (दि.१५) रात्री ८ वाजतादरम्यान अचानक आग लागली. दुकानातील एअर कंडीशनर (एसी) मध्ये शॉटसर्कीट झाल्याने ही आग लागली होती. मात्र वेळीच उपाययोजना केल्याने मोठे नुकसान टळले.उत्तम स्टोर्सच्या खालच्या माळ््याचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे येथे काहीच सामान नव्हते. मात्र पहिल्या माळ््यावर कपडे ठेवले होते. दुकानातील एअर कंडीनशरमध्ये शॉटसर्कीट झाल्याने आग लागली. रविवारी (दि.१५) रात्री ८ वाजतादरम्यान धूर निघू लागल्याने हा प्रकार उघडकीस आला. लगेच अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली व अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले.एसीमध्ये शॉटसर्कीट झाल्याने व एसीतील गॅसमुळे आणखी धोका होवू शकत असल्याने पाहून अग्निशमन विभागाच्या पथकाने एसीची पाईप लाईन तोडून गॅस काढली. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. वेळीच उपाययोजना करण्यात आल्यामुळे मोठा अपघात टळला.
कापड दुकानाला लागली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 10:01 PM
शहरातील मुख्य बाजार परिसरातील उत्तम स्टोर्स या कापड दुकानाला रविवारी (दि.१५) रात्री ८ वाजतादरम्यान अचानक आग लागली. दुकानातील एअर कंडीशनर (एसी) मध्ये शॉटसर्कीट झाल्याने ही आग लागली होती. मात्र वेळीच उपाययोजना केल्याने मोठे नुकसान टळले.
ठळक मुद्देएसीमध्ये शॉटसर्किट : वेळीच उपाययोजनेने नुकसान टळले