लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गुजरात राज्यातील सुरत येथील कोचिंग क्लासला लागलेल्या आगीमुळे २० विद्यार्थ्यांना नाहक बळी गेला. त्यामुळे या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर पसरले. त्यानंतर कोचिंग क्लासेसमधील सुरक्षाविषयक उपाय योजनांना घेवून प्रश्न चिन्ह उपस्थित झाले.मात्र कोंचिग क्लासेस प्रमाणेच गोंदिया जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये अग्नीशमन यंत्रच नसल्याची माहिती उघडकीस आली आहे.त्यामुळे १०३८ शाळांमधील हजारो विद्यार्थी धोका पत्थकारुन शिक्षण घेत असल्याची बाब पुढे आली आहे.जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १०३८ शाळा असून यापैकी किती शाळांमध्ये अग्नीशमन यंत्र आहेत, याची माहिती जि.प.शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारली असता त्यांना याबाबत माहितीच नसल्याची बाब पुढे आली आहे.गोंदिया जिल्ह्यातील १०३८ जि.प.च्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी जीव धोक्यात टाकून शिक्षण घेत आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १३२, आमगाव ११०, देवरी १४१, गोंदिया १८८, गोरेगाव १०८, सालेकसा १०९, सडक-अर्जुनी ११२, तिरोडा १३८ अश्या १०३८ शाळांमध्ये अग्नीशमन यंत्र नसल्याचे गृहीत धरायचे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही शाळांत ही यंत्रे आहेत त्या शाळांतील अग्नीशमन यंत्राची मुदत संपली आहे. त्याच्या नुतनीकरणासाठी एक ते दोन हजार रूपये खर्च येणार असते. त्यामुळे कोणत्याही शाळेत त्या अग्नीशमन यंत्राचे नुतनीकरण करीत नसल्याची माहिती आहे.त्यामुळे जि.प.शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या सुरक्षेप्रती किती सजग आहे याची प्रचिती येते. जि.प.चे शिक्षणाधिकारी विविध उपक्रम राबवून राज्य स्तरावर गोंदिया जिल्हा शिक्षणात कसा सरस आहे प्रसिध्द पत्रक काढून सांगायला विसरत नाही. मात्र दुसरीकडे अनेक शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध नसून त्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.युडायसच्या माहितीतही अग्नीशमनचा प्रश्नच नाहीप्रगत शैक्षणीक महाराष्ट्राचा विचार करतांना शाळांची माहिती भरण्यासाठी शासनाने शाळांची भौतिक सुविधा, गुणवत्ता या सर्व बाबींचा विचार केला. परंतु विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी असलेला अग्नीशमन यंत्र शाळेत उपलब्ध आहेत किंवा नाही यासंदर्भात माहिती देणारा कॉलम त्यात न ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांचा विचारच राज्य पातळीपासून होत नाही.धोका पत्करूनच विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागत आहे.
जि.प.च्या शाळांनाही अग्नीशमन यंत्राचे वावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 11:41 PM
गुजरात राज्यातील सुरत येथील कोचिंग क्लासला लागलेल्या आगीमुळे २० विद्यार्थ्यांना नाहक बळी गेला. त्यामुळे या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर पसरले. त्यानंतर कोचिंग क्लासेसमधील सुरक्षाविषयक उपाय योजनांना घेवून प्रश्न चिन्ह उपस्थित झाले.मात्र कोंचिग क्लासेस प्रमाणेच गोंदिया जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये अग्नीशमन यंत्रच नसल्याची माहिती उघडकीस आली आहे.
ठळक मुद्देअग्नीश्मन यंत्राची माहितीच नाही : शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार