लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नवेगावबांध-नागझिरा वन्य प्राण्यांसाठी बफर झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्र क्रमांक ५१२, ५१३, ५३२, ५३३, ५३५ मध्ये सोमवारी रात्री आग लागली.ही आग तेंदूपत्ता कंत्राटदारांनी लावल्याची विश्वसनीय माहिती असून तेंदूपत्ता तोडणी हंगामापूर्वी कंत्राटदार तेंदू मोठ्या प्रमाणात यावा, यासाठी जंगलात आग लावतात. यामुळे बरेचदा वनसंपत्तीचे नुकसान होते. वन्यप्राण्यांच्या जीवालाही धोका निर्माण होतो. नवेगावबांध-नागझिरा बफर झोन क्षेत्रात येणाºया मुरदोली, दोडके, पुतळी, डुग्गीपार शशीकरण पहाडी, शेंडा कोयलारी, आलेबेदर या परिसरातील जंगलात ही आग लागली. ती बफरझोन क्षेत्रात पसरली. वन्यजीव प्रेमींनी दिलेल्या माहितीनुसार याच परिसरात वन्यजीवांचा सर्वाधिक वावर असतो. त्यामुळे या आगीची झळ वन्यप्राण्यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.घटनेची माहिती मिळताच त्यांनी वन्यजीव विभागाच्या अधिकाºयांना कळविले. मात्र या विभागाच्या अधिकाºयांनी सुरुवातीला आग लागली नसल्याचे सांगितले. वनअधिकारी आगीच्या अशा घटनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सेवा संस्थेचे सावन बहेकार यांनी केला आहे. यातील काही भाग वनविकास महामंडळाच्या क्षेत्रात येतो.दरवर्षी तेंदूपत्ता कंत्राटदारांकडून जंगलात आग लावली जाते. यामुळे वन्यप्राण्यांना धोका पोहोचतो, त्यामुळे कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.- सावन बहेकार, अध्यक्ष सेवा संस्था गोंदिया.
सोमवारी शशीकरण पहाडी परिसरातील क्षेत्रात काही मोह तोडणाºया व्यक्तींनी आग लावली होती. यामुळे ६ हेक्टरमधील वनसंपदेची हानी झाली. मात्र आग वेळीच आटोक्यात आणण्यात आली.- गोवर्धन राठोड,वन परिक्षेत्र अधिकारी सडक-अर्जुनी