लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुक्यातील बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र प्रसूतीत मागील ५ वर्षापासून जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर येत आहे. १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या काळात या आरोग्य केंद्रात २१३ महिलांची सुरक्षित प्रसूती करण्यात आली आहे. यातील ९८ महिलांना तांबी बसविण्यात आली आहे.कुटुंब नियोजन २०३ लोकांचे केले आहे. यात पुरुषांचे ५७ तर १४६ महिलांचा समावेश आहे. रुग्णांसाठी या आरोग्य संस्थेत टोकन सिस्टम सुरु करण्यात आले आहे. आकस्मिक व गरोदर मातांना विविध सेवेसाठी सुट देण्यात आली आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात सन २०१६-१७ मध्ये २९ हजार ६५ ओपीडी होती. तर २०१७-१८ या वर्षात ३० हजार ४६५ ओपीडी आहेत. आंतररुग्ण सेवा २०१६-१७ मध्ये २ हजार ३१७ रुग्णांना तर २०१७-१८ मध्ये २ हजार ३ रुग्णांना देण्यात आली.येथील रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी बायोमेट्रिक प्रणाली सुरु करण्यात आली आहे. मागच्यावर्षी कुत्रा चावल्याचे ७३ रुग्ण, साप चावल्याचा एक रुग्ण, विंचु चावल्याचे ३३ रुग्ण तर इतर किडे चावल्याच्या ५ रुग्णांवर उपचार करण्यात आला. या रुग्णालयात प्रसुती करणाऱ्या १७७ इतक्या महिलांना जननी सुरक्षा योजनेचा लाभ देण्यात आला. गर्भवती व बाळंतीनींना मानव विकास योजनेमार्फत बुडित मजुरी दिली जाते. ही बुडीत मजुरी २९६ महिलांना देण्यात आली. प्रथम खेपेच्या महिलांना पंतप्रधान मातृवंदन योजनेचा लाभ देण्यात आला. त्यात लाभार्थी संख्या १४६ एवढी आहे. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेचाही लाभ देण्यात आला आहे. दररोज १२५ ते १५० रुग्णांची ओपीडी असलेल्या या बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला आनंदीबाई जोशी व सुरक्षित मातृत्व दिनानिमित्त गौरविण्यात आले आहे. २४ तास सापाची व कुत्र्याची लस उपलब्ध आहे.गर्भवतींची मोफत तपासणीगर्भवती महिलांना कवडीचाही खर्च येऊ नये यासाठी गर्भावस्थेत करण्यात येणाºया सर्व चाचण्या एचएलएल लॅबद्वारे मोफत करण्यात येतात. थायराईड, सीबीसी, मधुमेह, कावीळ, कोलेस्ट्राल, लिपीट प्रोफाईल, किडनी, हायपरटेंशन, रक्तदाचा मधुमेह यांची तपासणी करण्यात येते.अतिविशेष मिशन इंद्रधनुष्यप्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन योजनेंतर्गत अतिविशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम राबविण्यात येत आहे. लसीकरण मोहीमेत ज्या बाळाला किंवा मातेला लस देण्यात आली नाही. त्यांना लसीकरण रण्याचे काम करण्यात येत आहे.गर्भवतींना संदर्भ सेवा देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. रुग्णांच्या सेवेसाठी असलेल्या कार्यात आम्ही विशेष लक्ष घालत असल्यामुळे प्रसुतीचे प्रमाण सर्वाधिक आहे.-डॉ. अमर खोब्रागडेवैद्यकीय अधिकारी, बनगाव (आमगाव)
बनगाव आरोग्य केंद्र प्रसूतीत जिल्ह्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 9:14 PM
तालुक्यातील बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र प्रसूतीत मागील ५ वर्षापासून जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर येत आहे. १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या काळात या आरोग्य केंद्रात २१३ महिलांची सुरक्षित प्रसूती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे९८ महिलांना बसविली तांबी : २९६ महिलांना बुडीत मजुरीचा लाभ