नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या तीन टक्के रूग्णांना क्षयरोग आढळून येतो. क्षयरोगाचे उच्चाटन करण्यात जिल्ह्यात अत्यंत उत्कृष्ट काम केले जात आहे. जिल्हा क्षयरोग विभाग व दृष्टी बहुउद्देशिय विकास संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या जनजागृतीमुळे गोंदिया जिल्ह्याने क्षयरोग दूरीकरण मोहीमेत १०० पैकी ९३ गुण घेत राज्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. क्षयरूग्णांना बरे करण्यासाठी असलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून क्षयरोगावर आळा घालण्याच्या दिशेने महाराष्ट्रात सर्वात चांगले काम केले आहे.योग्य नियोजन व सतर्कता यामुळे जिल्ह्यातील क्षयरूग्णांचे रोगमुक्त होण्याचे प्रमाण ९३ टक्के आहे. आरोग्य विभागाच्या पाठपुराव्यामुळे रूग्णांच्या उपचारासाठी सातत्य राहात आहे. त्यामुळे क्षयरोगाचे समूळ उच्चाटनासाठी आरोग्य विभागाने डॉट्स उपचार पद्धती सुरू केल्यामुळे रूग्णांच्या मृत्यू दरात घसरण झाली आहे. त्यामुळे या उपचार पद्धती रूग्णांसाठी लाभदायी ठरत आहे. गोंदिया जिल्ह्याला रोगमुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक काही वर्षापासून सातत्याने प्रयत्नशील आहे. या पथकामध्ये राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत येणारे सर्व अधिकारी, आरोग्य कर्मचारी, खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांचा समावेश करण्यात आला आहे. एनजीओचे व क्षेत्रीय कर्मचारी, आशा वर्कर यांच्या माध्यमातून क्षयरोग आजाराबद्दल विविध माध्यमातून जनजागृती करणे व सर्वेक्षण करण्यात येते.सर्वेक्षणानंतर प्राथमिक टप्प्यात निदान होऊन तातडीने उपचार करून करण्यात येते.रूग्णांची उपचार पद्धती सुरू करण्यात येते. रूग्णांनी वैद्यकीय निर्देशाप्रमाणे सहा महिन्यापर्यंत डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचारांमध्ये सातत्य ठेवले पाहिजे. काही रूग्ण तात्पुरते उपचारासाठी बरे वाटले की लगेच औषधे बंद करतात असे निरीक्षण नोंदविण्यात येत आहे. त्यामुळे अशा रूग्णांचे रोग धोकादायक ठरू शकतो. हे रूग्ण दुसऱ्या टप्प्यात औषधांना दाद न देणारा यामध्ये पोहोचतो.परिणामी या अवस्थेतून रूग्णांना बाहेर पडणे कठीण असते. त्यामुळे उपचार पूर्ण झाल्यानंतर रूग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे बंद करावे असा सल्ला वैद्यकीय अधिकारी देतात. रूग्णाने बिडी, सिगारेट, गुटखा, तंबाखू, दारू या व्यसनापासून दूर राहावे. नशा आणणारे कोणते पदार्थ सेवन करू नये असा सल्ला रूग्णांना दिला जातो. या सर्व कामात उत्कृष्ट कार्य करणाºया गोंदिया जिल्ह्याने क्षयरोग दुरीकरण मोहीमेत राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे.सर्व रूग्णांना महिन्याकाठी दिले जातात ५०० रूपयेशासनाच्यावतीने सर्व क्षयरूग्णांना ५०० प्रती महिना पोषण आहाराचे देण्यात येते.उपचार पद्धत व रोग नियंत्रण कार्यक्रम राबविणे सुक्ष्मदर्शकाचा वापर करून फुफ्फुसांचे रोग लक्षणे तपासून संभाव्य क्षयरोगी शोधणे रोगावरील औषधांचा अखंड पुरवठा सुरूवातीच्या जास्त तीव्रतेच्या काळात उपचारावर थेट नजर ठेवणे हे रोगावरील प्रभावी औषधांचा डोज घेणाºया प्रत्येक व्यक्तींची आरोग्य कर्मचारी विचारपूर्वक व निरीक्षण करतात.प्रत्यक्ष रूग्णांवर केलेल्या उपचाराचे मूल्यमापन करण्यात येते. त्यांनी सकस आहार घ्यावा म्हणून महिन्याकाठी ५०० रूपये दिले जातात.यंदा आढळले ९६१ रूग्ण२०२० या वर्षांत मे अखेरमध्ये ९६१ क्षयरोगग्रस्त गोंदिया जिल्ह्यात आढळून आले आहेत. त्या रूग्णांवर उपचार सुरू आहे. ह्या रूग्णांना नियमतिपणे औषध दिले जाते.डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधे घेतल्यास हा रोग पूर्णपणे बरा होतो. पद्धती लाभदायक ठरते.गोंदिया जिल्हा महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकावर आल्याने जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश खवले यांनी २५ जून रोजी पहिल्याच दिवशी क्षयरोग दुरीकरण कार्यक्र मांतर्गत सर्व निर्देशांकामध्ये सन २०१९-२० या वित्तीय वर्षात उत्कृष्ट कार्याचे कौतुक करून जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. राज पराडकर यांना सन्मानित केले. दृष्टीचे अध्यक्ष डॉ.सचिन चौधरी व क्षयरोग दुरीकरणाच्या समन्वयक प्रज्ञा कांबळे उपस्थित होत्या.
क्षयरोग दुरीकरणात गोंदिया राज्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 5:00 AM
योग्य नियोजन व सतर्कता यामुळे जिल्ह्यातील क्षयरूग्णांचे रोगमुक्त होण्याचे प्रमाण ९३ टक्के आहे. आरोग्य विभागाच्या पाठपुराव्यामुळे रूग्णांच्या उपचारासाठी सातत्य राहात आहे. त्यामुळे क्षयरोगाचे समूळ उच्चाटनासाठी आरोग्य विभागाने डॉट्स उपचार पद्धती सुरू केल्यामुळे रूग्णांच्या मृत्यू दरात घसरण झाली आहे. त्यामुळे या उपचार पद्धती रूग्णांसाठी लाभदायी ठरत आहे.
ठळक मुद्दे९३ टक्के रुग्ण बरे । ३ टक्के लोकांना क्षयरोग