लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषदेकडून राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री शहरी आवास योजनेंतर्गत २१ लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. ४० हजार रूपयांची ही पहिली किश्त असून ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात टाकण्यात आली आहे.नगर परिषदेने यामाध्यमातून योजनेला सुरूवात केली असून लाभार्थींना त्यांचा आशियाना तयार करण्यासाठी आता अडचण येणार नाही. येत्या सन २०२२ पर्यंत देशात प्रत्येकाकडे त्यांच्या हक्काचे पक्के घर असावे हे स्वप्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बघितले आहे. त्यानुसार, शहरात नगर परिषदेच्या माध्यमातून प्रधानमंत्री शहरी आवास योजना राबविली जात आहे.या योजनेंतर्गत चार घटकांतून अर्ज मागविण्यात आले होते. यात, ज्यांच्याकडे स्वत:चे घर नाही अशांच्या चौथ्या घटकासाठी कार्य करण्यात आले. या घटकात १५०० हून अधीक अर्ज आले होते. त्यातील ५१५ अर्जांच्या प्रकल्प अहवालास मंजुरी मिळाली आहे.यातीलच २१ लाभार्थ्यांना ही ४० हजारांची पहिली किश्त देण्यात आली आहे. याशिवाय प्रती लाभार्थी राज्य शासनाकडून एक लाख रूपये व केंद्र शासनाकडून १.५० लाख रूपये दिले जाणार आहेत. यातील ही रक्कम राज्य शासनाच्या हिस्स्यातील आहे. या किश्तमधून बांधकामाची प्रगती बघून केंद्र शासनाक डून त्यांचा हिस्सा टप्प्याटप्प्याने दिला जाणार आहे.या घटकातील ५१५ लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाने ४० हजार रूपये प्रमाणे २.०६ कोटी रूपये नगर परिषदेला दिले आहेत. त्यानुसार, आता टप्प्याटप्प्याने उवर्रितांच्या खात्यातही किश्त जमा केली जाईल.गोंदिया नगर परिषद अव्वलजिल्ह्यात गोंदिया व तिरोडा नगर परिषद शिवाय गोरेगाव, देवरी, सालेकसा, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव नगर पंचायत आहे. शहरासाठी असलेल्या योजनेंतर्गत गोंदिया नगर परिषदेने योजनेंतर्गत किश्त वितरीत करून कामाला सुरूवात केली आहे. यामुळे गोंदिया नगर परिषद अव्वल ठरली असून या योजनेचे कामकाज बघणारे नगर परिषदेतील अभियंता सुमेध खापर्डे यांच्या कार्याची प्रशंसा केली जात आहे.
२१ लाभार्थ्यांना दिला पहिला हप्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 9:18 PM
नगर परिषदेकडून राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री शहरी आवास योजनेंतर्गत २१ लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. ४० हजार रूपयांची ही पहिली किश्त असून ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात टाकण्यात आली आहे.
ठळक मुद्देप्रधानमंत्री आवास योजना : ४० हजार रूपये बँक खात्यात