लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील मुर्री, चुटीया, पांगडी येथील शेकडो नागरिक दररोज रोजगार व इतर कामांसाठी गोंदियाला येतात. तर पांगडी या पर्यटन स्थळी पोहचण्यासाठी कारंजा बायपास मार्गे तिरोडा जाण्यासाठी याच मार्गाचा सर्वाधिक वापर होतो.या मार्गावर वर्दळ अधिक असून त्या तुलनेत चांगले रस्ते नसल्याने अपघातात वाढ होत होती. ही समस्या लक्षात घेवून मुर्री रेल्वे क्रासींग ते एफसीयआय गोदामापर्यंत मार्गाचे सिमेंटीकरण व मुर्री बाहेरील मार्गाबाहेर जाणाºया रस्त्याचे रुंदीकरण करुन डांबरीकरण करण्यात आले. तर १ कोटी ६० लाख रुपयांच्या निधीतून चुटीयापर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम करण्यात येणार आहे.यामुळे पांगडी, लोधीटोला, ढाकणी, रापेवाडा येथील गावकºयांना सुविधा होणार आहे. वाहतुकी दरम्यान नागरिकांच्या सुरक्षीततेलाच आपले प्रथम प्राधान्य असल्याचे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले. तालुक्यातील मुर्री-चुटीया या रस्ता रुंदीकरण कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.या वेळी जि.प.अध्यक्षा सीमा मडावी, जि.प.आरोग्य सभापती रमेश अंबुले, अरुण ठाकरे, लालजी कोठेवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे धनलाल ठाकरे, हिवराचे सरपंच संजय लिल्हारे, ढाकणीचे सरपंच नामदेव सहारे, हेमंत येरणे, संदीप टेंभेकर, पुष्पा अटराहे, अमृतलाल पतेह, दुर्गाप्रसाद धांदे, देवराव बर्वे, माजी.जि.प.सदस्य बाबुलाल रहांगडाले, शुभम लिचडे, महेंद्र आंबाडारे, संजू ठाकरे उपस्थित होते.तालुकाध्यक्ष प्रकाश रहमतकर म्हणाले, विरोधी पक्षात राहून सरकार व मंत्रालयातून विकास कामे खेचून आणने सोपे नाही. मात्र आ. अग्रवाल यांच्या राजकीय वजनामुळे सर्वाधिक विकास कामे गोंदिया विधानसभा क्षेत्रात झाली आहेत. त्यांच्या विकास कार्यामुळेच भाजपाच्या नेत्यांमध्ये चिड निर्माण झाली असल्याचा आरोप केला.गोंदिया येथे नवबौध्द विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाला आ.अग्रवाल यांनी मंजुरी मिळवून आणली होती. मात्र या बांधकामात भाजपाचे काही लोक अडचण निर्माण करीत असल्याचा आरोप केला. तसेच विकासाचे स्वप्न दाखविणाºयांनी नवबौध्द विद्यार्थ्यांच्या वसतिगृह बांधकामाला गती मिळवून द्यावी, असा टोला देखील रहमतकर यांनी लावला.सीमा मडावी म्हणाल्या, जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत नागरिकांना घरकुल मिळवून देण्याचा जि.प.प्रयत्न आहे. आ.अग्रवाल यांच्या नेतृत्त्वात अनेक विकास कामे सुरू असून यामुळे परिसराचा कायापालट होत असल्याचे सांगितले. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी सुध्दा मार्गदर्शन केले.
नागरिकांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 1:10 AM
तालुक्यातील मुर्री, चुटीया, पांगडी येथील शेकडो नागरिक दररोज रोजगार व इतर कामांसाठी गोंदियाला येतात. तर पांगडी या पर्यटन स्थळी पोहचण्यासाठी कारंजा बायपास मार्गे तिरोडा जाण्यासाठी याच मार्गाचा सर्वाधिक वापर होतो.
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : मुर्री-चुटीया मार्गाचे भूमिपूजन, गावकऱ्यांची समस्या होणार दूर