लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वाहतुकीसाठी चांगले रस्ते, शेतकऱ्यांना सिंचनाची सोय, नागरिकांना शुध्द पाणी व दर्जेदार आरोग्याची सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या कामांना आपले प्रथम प्राधान्य आहे. पायाभूत सुविधांचा विकास झाला तर परिसराचा सर्वांगीण विकास होईल. याच दृष्टीने तालुक्यात १० नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. तर सिंचनाच्या सुविधेमुळे मागील पाच वर्षांत चारशे हेक्टर जमिनीला सिंचनाची सोय झाल्याचे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी येथे केले.आ.अग्रवाल यांच्या प्रयत्नांने मंजूर ५० लाख रुपयांच्या निधीतून पांजरा-कामठा मार्गांचे डांबरीकरण व रस्ता सिंमेटीकरण कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्षा सीमा मडावी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून विजय लोणारे,सत्यम बहेकार, संतोष घरसेले, हुकुमचंद नागपूरे, टिकाराम भाजीपाले, दिनेश अग्रवाल, खेमन बिरनवार, चेतन नागपूरे, रमन लिल्हारे, महेश माहुले, रामरतन गणविर,अनिल धुर्वे, निर्मला सव्वालाखे, कविता मेश्राम, लक्ष्मी लिल्हारे, डुलेश्वरी कापसे, गिरधारी बघेले, रमेश नागपूरे, फागुजी मेश्राम, जयचंद लिल्हारे उपस्थित होते.सीमा मडावी म्हणाल्या, शासनाच्या विविध योजना जतनेपर्यंत पोहचवून त्यांचा सर्वांगिन विकास करण्याचे काम आ.अग्रवाल यांच्या नेतृत्वात सुरू आहे. विविध योजनांच्या शिबिरांचे आयोजन करुन गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला जात असल्याचे सांगितले.माधुरी हरिणखेडे म्हणाल्या, आ.अग्रवाल यांच्या नेतृत्त्वात या परिसरात विविध विकास कामे सुरू आहेत. रावणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारत बांधकामाला लवकरच सुरूवात होणार आहे. तर रजेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला त्यांच्याच पाठपुराव्यामुळे गती मिळाल्याचे सांगितले.सरपंच नागपूरे यांनी आ.अग्रवाल यांच्या पाठपुराव्यामुळे यावर्षी १२ लाख रुपयांच्या ग्रामपंचायत इमारत बांधकामाला मंजुरी मिळाली. तर पांगोली नदीवर पांजरा-लंबाटोला दरम्यान तयार करण्यात येणाºया बंधाºयामुळे या परिसरातील शेकडो हेक्टर जमिनीला सिंचनाची सोय होणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश रहमतकर, मनीष मेश्राम, गेंदलाल शरणागत, संतोष बागडे, इठूजी तावाडे, मनोज नैकाने, मोहन मेंढे, बाबुराव तावाडे, सुकचंद शहारे, बंडू सोलंकी यांनी सहकार्य केले.
पायाभूत सुविधा विकासाला प्रथम प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:22 AM
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : वाहतुकीसाठी चांगले रस्ते, शेतकऱ्यांना सिंचनाची सोय, नागरिकांना शुध्द पाणी व दर्जेदार आरोग्याची सुविधा व ...
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : पांजरा-खातीया येथे विकास कामांना सुरूवात