कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शुक्रवारी ७४० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी ५८७ नमुन्यांची आरटीपीसीआर तर १५१ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी चार नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. त्याचा पॉझिटिव्ह रेट ०.५४ आहे. कोरोनाचा संसर्ग आता बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला असून दोन तालुके पूर्णपणे काेरोनामुक्त झाले आहे. ही जिल्हावासीयांसाठी निश्चितच दिलासादायक बाब आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हावासीयांनी खबरदारी बाळगण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत २१३४९० नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी १८८३९२ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत २२१३८३ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी २००२९४ निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४११८० कोरोना बाधित आढळले असून यापैकी ४०४६८ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ११ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून दोन स्वॅब नमुन्याचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.
..................
५ लाख ४५ हजार नागरिकांचे लसीकरण
कोरोना विरुध्दच्या लढ्यात लसीकरण हे महत्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासन कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर देत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख ४५ हजार ७३१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाची एकूण टक्केवारी ४२ टक्के आहे.
..................
कोरोनाचा रिकव्हरी दर ९८.२७ टक्के
कोरोना बाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने कोरोनाचा रिकव्हरी रेट सातत्याने वाढत आहे. सद्यस्थितीत कोरोनाचा रिकव्हरी रेट ९८.२७ टक्के आहे.