शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

मत्स्य तलाव बचाव समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे

By admin | Published: May 10, 2017 1:09 AM

मत्स्य तलाव बचाव समितीद्वारे सोमवार (दि.१५) सकाळी ११ ते ५ वाजतापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मत्स्य तलाव बचाव समितीद्वारे सोमवार (दि.१५) सकाळी ११ ते ५ वाजतापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाचे नेतृत्व एकलव्य सेनेचे अध्यक्ष व राष्ट्रीय मत्स्यजीवी सहकारी संघ नवी दिल्लीचे माजी संचालक संजय केवट, को-आॅपरेटिव्ह बँक भंडाराचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, मत्स्य तलाव बचाव समितीचे अध्यक्ष परेश दुरूगकर, जयचंद लदरे, सीटूचे जिल्हा महासचिव महेंद्र वालदे, मत्स्य तलाव बचाव समितीचे सचिव जयेंद्र बागडे, खोमेश कांबळे, जनवादी महिला समितीच्या संयोजिका चंद्रकला कुतराहे करणार आहेत. मागण्यांमध्ये स्थगित असलेल्या तलावांचे स्थानिक परिसरातील संस्थांनाच मत्स्य व्यवसायाकरिता कंत्राट द्यावे, तलावातील चिखलाचा उपसा करुन दोन मीटर खोलीकरण करावे, तलावाच्या जलक्षेत्रामध्ये शेतकऱ्यांनी केलेले अतिक्रमण तलावाची पुर्नमोजणी करुन हटविण्यात यावे, गेट व पाळ दुरुस्त करावी, जाळे व नौका यावर शंभर टक्के अनुदान मिळावे, मत्स्य बाजार वेगळे ठेवून दुकानाकरिता ओटे, गाळे, सफाई, पाणी, वीज व इतर सुविधा शासकीय स्तरावर द्याव्या, ६० वर्षे वय झालेल्या सभासदांना मासीक ३ हजार रुपये पेंशन मिळावी, पाणी वापर संस्थेच्या तलाव लिलावाचे अधिकार रद्द करुन पंचायत समिती, जिल्हा परिषदेकडे द्यावे, शौचालयासाठी अनुदान द्यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.