गोंदिया : वनविभाग अंतर्गत मुंडीपार सहवनक्षेत्रातील नियत क्षेत्रात येत असलेल्या भागवतटोला येथे २९ जानेवारी रोजी राजमांजरीची शिकार करण्यात आली होती. प्रकरणी वनविभागाने पाच आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून शिकार केलेल्या चार रानमांजर जप्त करण्यात आल्या आहेत.
२९ जानेवारी रोजी झुडपी जंगलात रानमांजर शिकार करताना घटनास्थळावर पाच आरोपी होते. परंतु तीन आरोपी वनविभागाच्या पथकाला बघताच घटनास्थळावरून पळून गेले होते. यावर पथकाने आरोपी रामू रामचरण पाथरे (रा. कुडवा) व बाबा हरिचंद कावळे (रा. कुडवा) यांना घटनास्थळावरच अटक केली होती. त्यांच्याकडून पथकाने शिकार केलेल्या ४ रानमांजर जप्त केल्या होत्या. त्यानंतर ३० जानेवारी रोजी घटनास्थळावरून पळून गेलेले आरोपी प्रभू दमडी शेंडे (रा. कुडवा), कबीर बालकदास बिसेन (रा. कुडवा) व संजय छगडीलाल शेंडे (रा. कुडवा) यांना अटक करण्यात आली.
आरोपींनी पाळीव कुत्र्यांच्या मदतीने रानमांजरीचे शिकार केल्याचे कबूल केले. आरोपींना २ दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली आहे.