लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आषाढी एकादशीनिमित्त पंढरीच्या विठू माऊलीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी गोंदिया आगाराने पुढाकार घेत प्रवाशांची व्यवस्था केली आहे. गोंदिया आगाराच्या पाच बसेस पंढरपूर यात्रेसाठी अमरावती विभागाला देण्यात येणार आहे. या बसेस ६ व ७ तारखेला येथून निघणार आहेत.त्यामुळे विठू माऊलीच्या यात्रेसाठी भाविकांची सोय होणार आहे.राज्याचे आद्य दैवत असलेल्या विठ्ठलाची आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे यात्रा भरते. या यात्रेत अवघ्या राज्यातून भाविक सहभागी होतात. लहान्यांपासून वृद्धांपर्यंत लाखोंच्या संख्येत वारकरी या यात्रेत सहभागी होत असून आषाढी एकादशीला विठू माऊलीचे दर्शन घेतात. येत्या १२ तारखेला आषाढी एकादशी येत असून यात्रेतील वारकरी सोडून अन्य भाविकही आपापल्या सोयीने विठू माऊलीचे दर्शन घेतात. जिल्ह्यातून भाविक यात्रेत सहभागी होत नसले तरिही आपल्या सोयीने पंढरपूरला दर्शनासाठी जातात. विशेष म्हणजे, लाखोंच्या संख्येत भाविक एसटीने प्रवास करीत असल्याने अमरावती आगाराने भाविकांच्या सोयीसाठी जादा बसेसची मागणी केली आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील भाविकांच्या सोयीसह येथील बसेस अमरावती विभागाला देण्यासंदर्भात महाव्यवस्थापकांनी गोंदिया आगाराला गुरूवारी (दि.४) आदेश दिले. त्यानुसार, गोंदिया आगाराने पाच लालपरींची व्यवस्था केली आहे. या बसेस घेण्यासाठी अमरावती विभागानेच प्रत्येकी पाच चालक व वाहक येथे येणार असून तेच बसेस घेऊन जाणार आहेत.यातील काही चालक-वाहक शनिवारी (दि.६) तर काही रविवारी (दि.७) येणार असून बसेस नेतील. १२ तारखेची आषाढी एकादशी आटोपल्यावर या बसेस पुन्हा परत मिळणार.भाविकांना थेट प्रवासाची सोयजिल्हा व लगतच्या परिसरातील भाविक दिंडीत सहभागी होत नसले तरीही पंढरपूरला दर्शनासाठी जातात.अशात गोंदियाहून त्यांच्यासाठी थेट प्रवासाची सोय या पाच बसेसच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. अमरावतीचे चालक-वाहक आल्यावर ते कधी येथून बसेस घेवून जातील हे ठरल्यावर येथील भाविकही त्याच बसेसने जाऊ शकतील. यासाठी त्यांना आगार प्रमुखांशी संपर्क साधता येईल.
विठू माऊलीच्या यात्रेसाठी गोंदियाच्या पाच बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 11:51 PM
आषाढी एकादशीनिमित्त पंढरीच्या विठू माऊलीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी गोंदिया आगाराने पुढाकार घेत प्रवाशांची व्यवस्था केली आहे. गोंदिया आगाराच्या पाच बसेस पंढरपूर यात्रेसाठी अमरावती विभागाला देण्यात येणार आहे.
ठळक मुद्देआगाराकडून व्यवस्था : ६ व ७ तारखेला होणार रवाना