लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम तुमखेडा खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्य राजू विश्वनाथ टेंभूर्णीकर (४५) याचा गोळी झाडून खून करणाऱ्या आरोपींची संख्या पाच वर पोहचली आहे. त्या पाचही जणांवर गोंदिया ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये दुर्गेश लिल्हारे (३८), प्रल्हाद बनोटे (५०), प्रकाश लिल्हारे (२५), शेखर वाढवे (४५), सुरेश मचाडे (३५) सर्व रा. तुमखेडा खुर्द यांचा समावेश आहे.राजू २ जानेवारीला रावणवाडी येथे त्याच्या बहिणीच्या घरचा गॅस सिलिंडर संपल्याने गॅस सिलिंडर सोडण्यासाठी गेला होता. गावाला परतताना भाजीपाला घेऊन तो परत येत असताना रात्री ८.३० च्या सुमारास गावाजवळ असलेल्या नाल्याजवळ त्याच्यावर आरोपींनी गोळ्या झाडून खून केला.रात्री ९ वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळला. त्याच्या मृतदेहाजवळ त्याचा मोबाईल पडला होता व त्याच मोबाईलवरुन त्याच्या घरी माहिती देण्यात आली. यावर त्याच्या परिवारातील सदस्य लगेच घटनास्थळी पोहचले.जवळून त्याला गोळी मारण्यात आली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. या प्रकरणी पोलिसांनी दुर्गेश लिल्हारे (३८), प्रल्हाद बनोटे (५०) दोघांना अटक केली असून तीन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
ग्रा.पं.सदस्याचा पाच जणांनी केला खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 12:17 AM
ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम तुमखेडा खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्य राजू विश्वनाथ टेंभूर्णीकर (४५) याचा गोळी झाडून खून करणाऱ्या आरोपींची संख्या पाच वर पोहचली आहे. त्या पाचही जणांवर गोंदिया ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
ठळक मुद्देनिवडणुकीच्या वादातून वैमनस्य: तुमखेडा येथील प्रकरण