शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
3
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
4
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
5
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
6
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
7
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
8
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
9
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
10
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
11
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
12
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
13
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
14
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
15
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
16
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
17
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
19
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
20
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)

चित्रफितीचा आधार घेत केले पाच पोलिसांना निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2022 5:00 AM

७ मे २०२१ रोजी लॉकडाऊन काळात तालुक्यातील मुंडीपार येथे ठाणेदाराचे बीट अंमलदार प्रमोद सोनवणे आणि अनिल चक्रे यांनी अवैध दारू पकडून विशाल दसरिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कारवाई केली होती; परंतु या कारवाईविरोधात विशाल दसरिया यांनी चार पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार करताना पोलिसांनी त्यांना आठ पेट्या अवैध दारू पोलीस कर्मचारी मधू सोनी यांनी मित्र विशाल दसरियाला सुरक्षित ठेवण्यासाठी दिली होती. 

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा  :  सालेकसा पोलीस स्टेशनच्या पाच कर्मचाऱ्यांना अवैध दारू विक्री करणाऱ्यावर केलेली कारवाई खोटी असून, पोलिसांच्या विरोधात केलेल्या तक्रारीमुळे व दिलेल्या पुराव्याच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया यांनी तपासाअंती पाच पोलीस कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांसाठी निलंबित केले. त्यांना पोलीस स्टेशनमधून कार्यमुक्त करून पोलीस अधीक्षक कार्यालयात दर दोन दिवसांनी हजेरी लावण्याचा आदेश दिला. ७ मे २०२१ रोजी लॉकडाऊन काळात तालुक्यातील मुंडीपार येथे ठाणेदाराचे बीट अंमलदार प्रमोद सोनवणे आणि अनिल चक्रे यांनी अवैध दारू पकडून विशाल दसरिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कारवाई केली होती; परंतु या कारवाईविरोधात विशाल दसरिया यांनी चार पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार करताना पोलिसांनी त्यांना आठ पेट्या अवैध दारू पोलीस कर्मचारी मधू सोनी यांनी मित्र विशाल दसरियाला सुरक्षित ठेवण्यासाठी दिली होती. काही दिवसांनंतर एका पोलीस कर्मचाऱ्याने विशाल दसरियाला फोन करून म्हटले की, आम्ही एका व्यक्तीला पाठवीत आहोत. त्याच्याकडे दोन पेट्या दारू द्या. विशाल दसरिया यांनी दोन पेट्या दारू देत असताना पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले आणि अवैध दारू विक्री करण्याचा गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई केली. त्यामुळे या कारवाईला विरोध करीत विशाल दसरिया यांनी संबंधित पोलिसांच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार केली. तक्रारीची प्रत पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया, संबंधित आमदार, खासदार आणि गृहमंत्री महाराष्ट्र यांच्याकडेही केली. त्यांनी रेकॉर्ड केलेली चित्रफितीसुद्धा तपास करणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याकडे सादर केली. चित्रफितीच्या आधारे पाच पोलिसांना पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया यांनी १४ जानेवारी रोजी निलंबनाचे आदेश दिले.

तक्रार चार पोलिसांची अन् निलंबित झाले पाच- विशाल दसऱीया आणि भूषण मोहारे यांनी पोलिसांनी खोटी कारवाई केल्याबद्दल एकूण चार पोलिसांच्या विरोधात तक्रार केली होती. परंतु पोलीस अधीक्षक कार्यालयाने पाच पोलिसांना निलंबित केले आहे. याबद्दल अशी माहिती मिळाली की, अर्जदारांनी अशोक ढबाले, अनिल चक्री, प्रमोद सोनवाणे यांच्याविरोधात तक्रार केली होती. परंतु यापैकी कोणीतरी संतोष चुटे यांचे सुद्धा नाव या प्रकरणात समाविष्ट केले आणि एकूण पाच पोलिसांना निलंबित केले. 

तक्रार परत घेण्यासाठी केली होती पैशाची मागणी- निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांशी ‘लोकमत’ प्रतिनिधींनी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, अर्जदाराने आधीच खोटे आरोप लावून गृहमंत्रालय आमदार, खासदार आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे अर्ज करून निलंबन करण्याची मागणी केली होती. त्यानंतर निलंबन परत घेण्यासाठी संबंधित पोलिसांनाच ३० लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला.

 खात्यावर जमा झालेल्या रकमेने केला घात - विशाल दसरिया आणि भूषण मोहाचे यांनी सहा महिन्यांनंतर पत्रकार परिषद घेऊन चार पोलिसांविरोधात आपली बाजू मांडली व तथाकथित खोटी कारवाईची चित्रफितीसुद्धा पत्रकार परिषदेत सादर केली. पोलीस अधीक्षक कार्यालयाने उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकूल यांना तपास करण्याचे निर्देश दिले. त्यांनी या प्रकरणाचा तपास करून तसा अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर केला. पोलीस अधीक्षक कार्यालयाने चित्रफिती आणि पोलीस कर्मचारी मधू सोनी यांच्या खात्यावर वटवलेली रक्कम याचा आधार घेत पाच पोलिसांना निलंबित केले.

 

टॅग्स :Policeपोलिस