कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सर्वांच्या स्वप्नातील हक्काच्या घरकुलाचे साकारण्यासाठी गृहनिर्माण आणि नागरि दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाकडून पतप्रधान शहरी आवास योजना राबविली जात आहे. चार विविध घटकांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या योजनेंतर्गत आपल्या हक्काच्या आशियानासाठी नगर परिषदेकडे शहरातील चार हजार ६६७ नागरिकांनी अर्ज केले आहे.आपले हक्काचे घर असावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठी कित्येक जण आपल्या पोटाला चिमटा देऊन पै पै जोडतात. जोडलेला पैसा कमी पडल्यास उधार उसणवारी किंवा बँकेक डून कर्ज घेऊन छोट्याशा काही होईना घरकुलाचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. यात कित्येकांची स्वप्नपुर्ती होते तर काहींना भाडयाच्या घरात तर त्यापेक्षा हलाखीची परिस्थिती असलेल्यांना झोपडपट्टीतच जीवन जगावे लागते. मात्र प्रत्येकाकडे त्यांच्या हक्काचे घर असावे हा हेतू बाळगून गृहनिर्माण आणि नागरी दारिद्र्य निर्मुलन मंत्रालयाच्यावतीने पंतप्रधान आवास योजना राबविली जात आहे. ग्रामीण व शहरी अशा दोन भागांत राबविण्यात येत असलेल्या या योजनेला देशात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. २०२२ पर्यंत प्रत्येकाला त्यांच्या हक्काचे घर देण्याचा शासनाचे उद्दिष्टय आहे. सर्व घटकातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळावा. यासाठी ही योजना चार टप्प्यात राबविली जात आहे. शहरातील नागरिकांची गरज लक्षात घेत ही योजना पंतप्रधान आवास योजना (शहरी) या नावाने राबविली जात आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात ही योजना राबविली जात असल्याने यासाठी नगर परिषदेकडे आतापर्यंत ४ हजार ६६७ अर्ज आले आहेत. यावर नगर परिषदेकडून कारवाई सुरू आहे.त्यामुळे अर्ज करणाऱ्या नागरिकांचे हक्काच्या घरकुलाचे स्वप्न साकारण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यात आहे.नगर परिषदेक डून प्रक्रिया सुरूचार घटकांतून राबविण्यात येत असलेल्या या योजनेंतर्गत नगर परिषदेला चार हजार ६६७ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील पात्र अर्जांची छाननी सुरू आहे. याशिवाय नगर परिषदेकडून यासाठी आवश्यक ती प्रक्रिया सुरू आहे. या योजनेचे शहरात क्रियान्वयन झाल्यास शहरातील झोपडपट्टी भागातील नागरिकांना फायदा मिळणार.याशिवाय कमकुवत घटकातील नागरिकांनाही त्यांच्या हक्काची घरे मिळणार आहे.
हक्काच्या आशियानासाठी पाच हजार अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 9:42 PM
सर्वांच्या स्वप्नातील हक्काच्या घरकुलाचे साकारण्यासाठी गृहनिर्माण आणि नागरि दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाकडून पतप्रधान शहरी आवास योजना राबविली जात आहे. चार विविध घटकांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या योजनेंतर्गत आपल्या हक्काच्या आशियानासाठी नगर परिषदेकडे शहरातील चार हजार ६६७ नागरिकांनी अर्ज केले आहे.
ठळक मुद्देपंतप्रधान शहरी आवास योजना : चार घटकांतून होणार घरांची निर्मिती