घरमालकाचे कृत्य : विविध कलमान्वये शिक्षागोंदिया : घरी भाड्याने राहणाऱ्या १० वर्षाच्या बालिकेवर बळजबरी करणाऱ्या नराधम घरमालकाला जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्षाची शिक्षा व २ हजार ३०० रुपये दंड ठोठावला आहे. सदर सुनावणी शुक्रवारी जिल्हा सत्र न्यायालयात करण्यात आली. गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या संजयनगर पिंडकेपार येथील आरोपी भरतलाल बिजोबा मेश्राम (४५) याने घरी कुणीही नसल्याचे पाहून त्याच्या घरी भाड्याने राहणाऱ्या एका १० वर्षाच्या विद्यार्थीनीवर ३१ मे २०१४ ते ३ जून २०१४ या दरम्यान तिच्यावर बळजबरी केली. हा त्रास असह्य झाल्यानंतर नराधमाचे पितळ उघडले पडले. गोंदिया शहर पोलिसात त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर.द्विवेदी यांनी केली. सरकारी वकील म्हणून अॅड.शबाना अंसारी यांनी काम पाहिले. या प्रकरणातील आरोपी भरतलाल बिजोबा मेश्राम (४५) रा.संजयनगर पिंडकेपार याला कलम ३७६ अंतर्गत पाच वर्षाची शिक्षा, ५०० रुपये दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा, बाल लंैगिक अत्याचार अधिनियमाचे कलम ७, ८ अंतर्गत ३ वर्षाचा कारावास व ५०० रुपये दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा, कलम ३५४ (अ) अंतर्गत एक वर्षाची शिक्षा २०० रुपये दंड, आणि दंड न भरल्यास १५ दिवसांचा कारावास, कलम ३७६ (ब) अंतर्गत ३ वर्षाचा कारावास व ५०० रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याचे कलम ३ अंतर्गत एक वर्षाची शिक्षा व २०० रुपये दंड, तथा दंड न भरल्यास १५ दिवसांची शिक्षा भादंविचे कलम १०६ नुसार १ वर्षाची शिक्षा २०० रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवसाची शिक्षा, कलम ४१० अंतर्गत एक वर्षाची शिक्षा २८० रुपये दंड न भरल्यास १५ दिवसांची शिक्षा सुनावली. सदर प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक नखाते यांनी केला होता. (तालुका प्रतिनिधी)
चिमुकलीवरील बलात्काऱ्यास पाच वर्षांचा कारावास
By admin | Published: February 14, 2016 1:41 AM