अध्यक्षस्थानी संरक्षक डॉ.सुधीर जोशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून हुकूमचंद अग्रवाल, सुनिता अग्रवाल, स्नेहित रोकड़े, सविता बेदरकर, नरेश लालवानी, मंजू कटरे, रवि सपाटे, पूजा तिवारी, शिखा पिपलेवार, हरीश अग्रवाल, लक्ष्मण लधानी, अशोक कानसकर, अश्विन खोब्रागड़े, द्वारकाताई सावंत, नगरसेविका भावना कदम, अफसाना पठान, मैथुला बिसेन, दिव्या भगत पारधी, संगीता घोष, यादोराव येडे उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित कोरोना योद्धा, कोरोना काळात शहरात सेवा देणाऱ्या संस्था, तसेच केटीेएस रुग्णालयात नि:शुल्क भोजन व्यवस्था करणाऱ्या लायंस क्लब कार्यकर्तांचा, रेल्वे स्थानकावर पाणीवाटप करणारे लक्ष्मण लधानी व सदस्यांचा, मोक्षधाम सेवा समिती सदस्य, नेत्रदान समिती सदस्य, सायकल अ़ॉन संडे पथक, कोरोना रुग्णांना नि:शुल्क ऑटोसेवा देणारे अशोक कानसकर एवं अश्विन खोब्रागडे यांचा, अनाथांची माउली म्हणून ओळख असलेल्या प्रा.सविता बेदरकर, तसेच अग्निशमन दल, तसेच योगशिक्षिका माधुरी परमार यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मुख्य संयोजक व नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी, कोरोना काळात निस्वार्थ सेवा देणाऱ्या या संस्था व व्यक्तींकडून असेच कार्य सतत सुरू राहणार अशी अपेक्षा व्यक्त केली. संचालन दीपक कदम यांनी केले. आभार अमृत इंगळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी राजा कदम, अजय इंगळे, मुजीब पठान, संजय इंगळे, बबन येटरे, मुकेश तिवारी, रवि हलमारे, अजिंक्य इंगळे, अभय सावंत आदींनी सहकार्य केले.