हेमंत पटले : कार्यकर्ता मेळावा व सत्कार समारंभ सालेकसा : भारतीय जनता पक्ष सर्वसामान्यांना घेऊन चालणारा लोकतांत्रिक पक्ष आहे. या पक्षात निष्ठावान कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. आज भाजप देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनला आहे. त्यामुळे प्रत्येक गावात आता भाजपचा संघटनात्मक विस्तार केला जाणार असून यात सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. हेमंत पटले यांनी केले. सालेकसा येथे सहकारी भातगिरणीत भाजप कार्यकर्ता मेळावा व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या सत्कार कार्यक्रमात ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुका भाजप अध्यक्ष परसराम फुंडे होते. अतिथी म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, आमगाव-देवरी क्षेत्राचे आ. संजय पुराम, माजी आ. भेरसिंह नागपुरे, केशव मानकर, जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर, जि.प. समाजकल्याण सभापती देवराज वडगाये, जिल्हा आदिवासी महामंत्री शंकर मडावी, माजी सभापती बाबुलाल उपराडे, खेमराज लिल्हारे, महिला तालुकाध्यक्ष कल्याणी कटरे, पं.स. सदस्य प्रतिभा परिहार, प्रमिला दसरिया, माजी जि.प. सभापती श्रावण राणा, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष ईसराम बहेकार, माजी सभापती छाया बल्हारे, पं.स. सदस्य जया डोये, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संदीप डेकाटे व इतर मान्यवर उपस्थित होते. दिवंगत भाजप नेते राकेश शर्मा यांच्या छायाचित्रासमोर दीप प्रज्वलन आणि माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. मागील अनेक निवडणुकीत सर्वत्र भाजपला मिळत असलेल्या अभूतपूर्व यशाचा आनंद प्रत्येक नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. भाजपची विजयी घोडदौड सुरू रहावी आणि कार्यकर्त्यांच्या उत्साह वाढत जावा, या दृष्टीकोनातून प्रत्येक जेष्ठ नेत्यांनी आपल्या भाषणात समयोचित मार्गदर्शन केले. भाजपचा प्रत्येक लोकप्रतिनिधी लोकाभिमुख कामगिरी बजाबत असल्याबद्दल वरिष्ठांनी कौतुक केले व कार्यकर्त्यांनी समाधान मानून घेतले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत तालुक्यातील काही ज्वलंत समस्यासुध्दा मांडल्या. तसेच पक्षासाठी निष्ठेने काम करण्याची ग्वाही सुध्दा दिली. या वेळी माजी जि.प. सदस्य रामाजी गावराणे, प्रेमलता दमाहे, चरणदास चंद्रिकापुरे, दिनेश वशिष्ठ, मेहतर दमाहे, माजी पं.स. सदस्य मनोज इळपाते, संगीता सहारे, उर्मिला मडावी, मंजू बनोठे, जगन्नाथ परिहार, संजू कटरे, गौरीशंकर बिसेन, मुलचंद गावराने, अजय वशिष्ठ व इतर पदाधिकारी उपस्थित होते. संचालन तालुका महामंत्री राजेंद्र बडोले यांनी केले. आभार महामंत्री मनोज बोपचे यांनी मानले. कार्यक्रमासाठी आर.डी. रहांगडाले, गुणवंत बिसेन, राजू बोपचे, आदित्य शर्मा, उत्कर्ष शर्मा, अरुण टेंभरे, अर्जुनसिंह बैस, बबलू भाटीया, चुन्नीलाल मरस्कोल्हे, गणेश फरकुंडे, रतनलाल टेंभरे, निश्चल जैन, राजेंद्र वालदे, साहेबराव मच्छिरके, सुनील अग्रवाल, रमसुला चुटे, बोहरे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी) नवनिर्वाचितांचा सत्कार थेट जनतेच्या मनातून भरघोष मतांनी निवडून आलेले गोंदियाचे नगराध्यक्ष अशोक इंगळे, राजेंद्र जैन यांना पछाडत विधान परिषद गाठणारे डॉ. परिणय फुके व नागपूर विभाग शिक्षक मतदार संघातून दुसऱ्यांना निवडून आलेले नागो गाणार यांचा सत्कार कार्यक्रम सुध्दा यावेळी आयोजित करण्यात आला होता. परंतु आवश्यक कामांमुळे परिणय फुके आणि नागो गाणार सत्कार कार्यक्रमात पोहचू शकले नाही. मात्र अशोक इंगळे यांचा या वेळी शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आदित्य शर्मा महामंत्री नियुक्त दिवंगत भाजप नेते राकेश शर्मा यांचा पुतण्या आदित्य शर्मा यांना तालुका महामंत्री पदावर नियुक्ती देण्यात आली. या आधी आदित्य शर्मा यांनी विदर्भात अनेक ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संघटनात्मक कामाची जवाबदारी सांभाळली. अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश कार्यकर्ता संमेलनाचे औचित्य साधून जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या समक्ष इतर पक्षातील अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये शामील झाले. यात दरेकसा येथील राजेश कनौजे, रामदास साखरे, मनीराम ठाकरे, चौकी विचारपूर येथील धनेश्वर नागपुरे, छगन रतोने, लोहारा येथील खुशाल नारायण कटरे, धर्मराज येरणे केहरीटोला येथील सालीकराम चौधरी, मोहन राऊत, राजकुमार राऊत, यशवंत मानकर, कोटरा येथील अनिल डोये, जियालाल मडावी तसेच टोयागोंदी येथील उपसरपंच तेजलाल परके यांचा समावेश आहे. भाजपमध्ये प्रवेश घेणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये एक शिवसेना, दोन बसपा व ११ कार्यकर्ते काँग्रेस सोडून आले. त्या सर्वांचा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले आणि आ. संजय पुराम यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच तालुका पदाधिकाऱ्यांनी त्यांची सदस्यता पावती कापली.
संघटनात्मक विस्तारावर भर
By admin | Published: March 04, 2017 12:14 AM