शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
2
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
3
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
4
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
5
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
6
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
7
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
8
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
9
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
10
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
11
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
12
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
13
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
14
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
15
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
16
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
17
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
18
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान
19
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
20
अफवेच्या तणावावर ‘थेरपी’ मुंबई विमानतळावर ‘पेट मी’ अनोखा उपक्रम 

शेतकऱ्यांची कामे वेळीच मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 10:23 PM

सर्व विभाग प्रमुखांनी आपआपली कामे जबाबदारीने करावीत. जनहिताच्या कामात कुठलाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. शेतकरी आपल्या विविध कामासाठी शासकीय कार्यालयात आले असता त्यांची कामे वेळीच मार्गी लावण्याचे निर्देश खा.मधुकर कुकडे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देमधुकर कुकडे : आढावा बैठक, विविध प्रश्न लावले मार्गी

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : सर्व विभाग प्रमुखांनी आपआपली कामे जबाबदारीने करावीत. जनहिताच्या कामात कुठलाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. शेतकरी आपल्या विविध कामासाठी शासकीय कार्यालयात आले असता त्यांची कामे वेळीच मार्गी लावण्याचे निर्देश खा.मधुकर कुकडे यांनी अधिकाऱ्यांना दिले.येथील पंचायत समिती कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी सभापती निता रहांगडाले, उपसभापती मनोहर राऊत, पं.स.सदस्य किशोर पारधी, नत्थू अंबुले, माया शरणागत, उषा किंदरले, माया भगत, प्रवीण पटले, संध्या गजभिये, जया धावडे, रमणिक सोयाम, प्रदीप मेश्राम, ब्रिजलाल रहांगडाले, माया रहांगडाले, गटविकास अधिकारी डी.बी.हरिणखेडे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्र्रकाश गंगापारी उपस्थित होते. या वेळी सर्व विभाग प्रमुखांनी आपआपल्या विभागाचा अहवाल सादर केला.परंतु लघू पाटबंधारे विभाग व धापेवाडा उपसा सिंचन विभाग अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे निर्देश खा. कुकडे यांनी दिले. सुकडी आरोग्य केंद्रातील गलथान कारभार पं.स.सदस्य किशोर पारधी यांनी बिल दाखवून कुकडे यांच्या निदर्शनात आणून दिला. सामान खरेदीचे बिले जोडली व पैसा काढल्याने लाग बुकची मागणी केली असता ते उपलब्ध करुन देण्यात आले नसल्याचे सांगितले.मुंडीकोटा येथील रस्ता बांधकामाच्या मुद्यावर बैठकीत वादळी चर्चा झाली. बांधकामाच्या चौकशीचा निर्णय घेण्यात आला.लोणारा येथील दोन वर्षापासून प्रलंबित असलेल्या रोजगार सेवकाचा प्रश्न निकाली काढण्याचा निर्णय घेण्यात आला. तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, पीक विमा प्रश्नावर आमची जबाबदारी नाही हे काम बँकेचे असल्याचे सांगितले.यावर सभागृहातील सरपंच, शेतकरी भांडारकर, शरणागत, इंदोराचे सरपंच नितेश खोब्रागडे यांनी मुद्दा उचलून धरला. यावर चांगलीच खडाजंगी झाली. शेवटी खासदारांनी हस्तक्षेप करुन शेतकऱ्यांची कामे झालीच पाहिजेत असे सांगितले. मनोरा ग्रामसेवकाचे प्रकरण चार महिन्यापासून प्रलंबित असल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर याप्रकरणी योग्य कारवाही करण्याचे निर्देश कुकडे यांनी दिले. गटविकास अधिकारी हरिणखेडे यांनी माहिती दिली. संचालन व आभार डॉ. प्रकाश गंगापारी यांनी मानले.

टॅग्स :Farmerशेतकरी