लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य विधानसभा लोकलेखा समितीच अध्यक्ष आ. गोपालदास अग्रवाल १० सदस्यीय शिष्टमंडळासह अभ्यास दौऱ्यावर गेले आहेत. ५ तारखेपासून सुरू झालेल्या या दौऱ्यात ते ब्रिटन, नेदरलँड व फ्रांसला भेट देणार आहेत. यात ते तेथील संसदीय कार्यप्रणालीचे अवलोकन करून तेथील लोकलेखा समितीची भेट घेऊन माहितीचे आदान प्रदान करणार आहेत.या दौऱ्यातील पहिल्या टप्प्यात समितीचे अध्यक्ष आमदार गोपालदास अग्रवाल व शिष्टमंडळाने ब्रिटनची राजधानी लंडन येथील ब्रिटिश संसदेतील ‘हाऊस आॅफ लॉर्ड’ व ‘हाऊस व कॉमन’ मध्ये उपस्थित राहून ब्रिटनच्या प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत ब्रिटिश संसदीय कार्यप्रणालीचे अवलोकन केले. तसेच ब्रिटेनच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष व खासदार मेगहिलर यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत अनेत महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करीत त्यांना सन्मानित केले. शिष्टमंडळाने ब्रिटिश संसदेच्या महत्वपूर्ण कॉमनवेल्थ पार्लामेंट असेम्बलीचे सभापती जेम्स पाँड सह चार खासदारांसोबत बैठक करुन अनेक विषयांवर चर्चा केली.ब्रिटन येथील लोकलेखा समिती कशी कार्य करते, त्यांची कार्यपध्दती काय हे सर्व शिष्टमंडळाने माहिती करुन घेतले. तसेच भारतीय दुतावासातील भारताचे राजदूत यशवंत सिन्हा यांची भेट घेऊन भारत व महाराष्ट्रातील वर्तमान परिस्थितींबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे, या दौऱ्याबाबत आमदार अग्रवाल यांनी काँग्रेस कमिटी शहर महासचिव अपूर्व अग्रवाल यांच्याशी फोनवर चर्चा केली. यात त्यांनी लोकलेखा समितीचा हा दौरा ऐतिहासिक असून यामुळे राज्यात अनेक सकारात्मक परिणाम बघावयास मिळतील असे सांगीतले.१२ तारखेला येणार परतया दौºयात लोकलेखा समितीचे शिष्टमंडळ शुक्रवारी (दि.७) नेदरलँडमध्ये होते. येथे संसदीय कारवाईचे ते अवलोकन करणार आहेत. त्यानंतर मंगळवारी (दि.११) फ्रांसचा दौरा करून तेथून बुधवारी (दि.१२) परत येणार आहेत. या प्रतिनिधी मंडळात समितीचे अध्यक्ष आमदार अग्रवाल यांच्यासह समितीतील नऊ सदस्य असून सोबतच दोन वरिष्ठ अधिकारीही आहेत.
लोकलेखा समितीचा विदेशदौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 12:50 AM
राज्य विधानसभा लोकलेखा समितीच अध्यक्ष आ. गोपालदास अग्रवाल १० सदस्यीय शिष्टमंडळासह अभ्यास दौऱ्यावर गेले आहेत. ५ तारखेपासून सुरू झालेल्या या दौºयात ते ब्रिटन, नेदरलँड व फ्रांसला भेट देणार आहेत.
ठळक मुद्देआ. अग्रवाल आणि शिष्टमंडळ : ब्रिटेन, नेदरलँड व फ्रांसला भेट देणार