लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी स्वतंत्र भारताच्या इतिहासात झाल्या नाहीत अशा सर्वसामान्यांना लाभदायी योजनांना आम्ही गती दिली. मात्र तरिही निवडणुकीत काम करणाऱ्या हातांना मजबूत न करता जाती व धर्माच्या नावावर आमची माणसे असक्षम नेता निवडतात. मात्र क्षेत्राच्या विकासासाठी योग्य, सक्षम व दूरदृष्टी ठेवणाऱ्या जनप्रतिनिधीची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.शासनाच्या २५१५ योजनेंतर्गत १० लाख रूपयांच्या निधीतून तालुक्यातील ग्राम सिरपूर येथे मंजूर सिमेंट रस्ता बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे यांनी, आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नानेच गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची स्थापना झाली असून उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम अंतीम टप्प्यात आहे. नागरिकांकडून काही मागण्यापूर्वीच आमदार अग्रवाल यांच्या नेतृत्वात प्रत्येक समस्यांचा स्थायी तोडगा काढण्यासाठी कॉंग्रेस पक्ष प्रयत्नशील असल्याचे सांगीतले.कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष सिमा मडावी, सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती उपसभापती चमन बिसेन, कुंदन कटारे, विमला पटले, मनिष मेश्राम, सत्यम बहेकार, गेंदलाल शरणागत, अशोक मेंढे, संजोग रामटेके, तुळशीदास डोंगरे, तिलकचंद ठाकरे, भाऊदास येरणे, निता ठाकूर, योगीता मेंढे, गिता डोंगरे, टिकेश्वरी वलके, निशा नागपुरे, महेंद्र घोडेस्वार, कल्पना येरणे, सुकचंद पटले, हेमराज रहांगडाले, रामेश्वर वलके, रघु येरणे, लहु डोंगरे, प्रकाश नैकाने यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
क्षेत्राच्या विकासासाठी दूरदृष्टीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 1:10 AM
क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी स्वतंत्र भारताच्या इतिहासात झाल्या नाहीत अशा सर्वसामान्यांना लाभदायी योजनांना आम्ही गती दिली.
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ग्राम सिरपूर येथील रस्ता बांधकामाचे भूमिपूजन