शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

वर्षभरात ४४ हजार पर्यटकांची जंगल सफारी

By admin | Published: May 06, 2017 12:53 AM

गोंदिया-भंडारा पर्यटन सर्किटमध्ये प्रामुख्याने नागझिरा, न्यू नागझिरा, कोका अभयारण्य व नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाचा समावेश आहे.

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प : ३२.७२ लाखांचा मिळाला महसूल लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : गोंदिया-भंडारा पर्यटन सर्किटमध्ये प्रामुख्याने नागझिरा, न्यू नागझिरा, कोका अभयारण्य व नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाचा समावेश आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात तब्बल ४४ हजार ०३० पर्यटकांनी जंगल सफारी केली असून त्याद्वारे ३२ लाख ७३ हजार ३३६ रूपयांचा महसूल प्राप्त झाल्याची माहिती वन्यजीव विभागाने दिली आहे. राज्यातील पर्यटकांसह परप्रांतीय व विदेशी पर्यंटकही येथे निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात येतात. आॅन लाईन बुकींगच्या माध्यमातून नागझिरा, न्यू नागझिरा व कोका अभयारण्यात भेटी देणे सुरू आहे. सदर आर्थिक वर्षात नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला ६० विदेशी पर्यटकांसह तब्बल ४४ हजार ०३० पर्यटकांनी भेटी दिल्या. त्यांच्याकडून १९ लाख ५६ हजार ५५१ रूपयांची वसुली करण्यात आली. त्यांनी ८२ जड व सात हजार ४५७ हलक्या अशा एकूण सात हजार ५४० वाहनांचा उपयोग केला. वाहनांसाठी त्यांच्याकडून १० लाख ८४ हजार ८६० रूपये प्रवेश शुल्क वसूल करण्यात आले. तर दोन हजार ३३५ कॅमेऱ्यांच्या उपयोगातून दोन लाख ३१ हजार ९५५ रूपयांचे उत्पन्न मिळाले. असा एकूण ३२ लाख ७३ हजार ३६६ रूपयांचा महसूल व्याघ्र प्रकल्पाला मिळाला. यात नवेगाव राष्ट्रीय उद्यानाला दोन हजार ५३८ पर्यटकांनी भेटी दिल्या. त्यातून ७० हजार ८२५ रूपयांचा महसूल गोळा झाला. तेथे उपयोगात आणलेल्या एकूण ४१५ हलक्या व जड वाहनांद्वारे ४२ हजार ४१० रूपयांचा महसूल मिळाला. तर १७३ कॅमेऱ्यांच्या उपयोगातून १७ हजार ४१० रूपये गोळा झाले. असा एकूण नवेगाव राष्ट्रीय उद्यानाच्या पर्यटनातून एक लाख ३० हजार ६४० रूपयांचा महसूल संबंधित विभागाला प्राप्त झाला. नागझिरा अभयारण्याला आठ हजार ३०३ पर्यटकांनी भेटी दिल्या. त्यातून तीन लाख ५९ हजार ७०० रूपयांचा महसूल गोळा झाला. एक हजार ३९९ वाहनांच्या उपयोगातून एक लाख ९५ हजार ९५० रूपये व ८१० कॅमेऱ्यांच्या उपयोगातून ८१ हजार रूपयांचा महसूल मिळाला. असा एकूण सहा लाख ३६ हजार ६५० रूपयांचा महसूल संबंधित विभागाला प्राप्त झाला. नवीन नागझिरा अभयारण्याला सर्वाधिक म्हणजे २९ हजार ४४७ पर्यटकांनी भेटी दिल्या असून त्यात ६० विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. त्यांच्याकडून १४ लाख २१ हजार ००१ रूपयांची वसुली झाली. तर हलके व जड वाहन मिळून एकूण पाच हजार ४२२ वाहनांच्या उपयोगातून आठ लाख १६ हजार १०० रूपये व एक हजार ३२२ कॅमेऱ्यांच्या उपयोगातून एक लाख ३० हजार ५५० रूपये मिळाले. असा एकूण २३ लाख ६७ हजार ६५१ रूपयांचा महसूल संबंधित विभागाला प्राप्त झाला. नवेगाव अभयारण्याला केवळ १०४ पर्यटकांनी भेटी दिल्या. त्यांच्याकडून दोन हजार ८०० रूपयांचे शुल्क वसूल करण्यात आले. २५ जड वाहनांच्या उपयोगातून दोन हजार ५०० रूपये व एका कॅमेऱ्याच्या उपयोगातून १०० रूपये असा एकूण पाच हजार ४२० रूपयांचा महसूल उपलब्ध झाला. तसेच कोका अभयारण्याला एकूण तीन हजार ६३८ पर्यटकांनी भेटी दिल्या. त्याद्वारे एक लाख दोन हजार २०५ रूपयांचा महसूल जमा झाला. शिवाय वापरलेल्या २७९ वाहनांतून २७ हजार ९०० रूपये गोळा झाले. २९ कॅमेऱ्यांच्या उपयोगातून दोन हजार ९०० रूपये असा एकूण एक लाख ३३ हजार ००५ रूपयांचा महसूल महसूल सदर विभागाला मिळाला. पर्यटन सर्किटचे काम प्रलंबित जिल्ह्यातील प्रेक्षणिय स्थळांचे एक सर्किट असावे, यासाठी तसा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या पर्यटन सर्किटच्या माध्यमातून पर्यटकांना जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळी जावून पर्यटनाचा आनंद घेता येणार होते. मात्र मागील तीन वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या पर्यटन सर्किटच्या प्रस्तावाचे काय झाले, याबाबत माहिती मिळू शकली नाही.