शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

भाजपला आश्वासनांचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:11 AM

तालुक्यासह संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस पक्षाने नेहमी शेतकºयांचा आवाज उचलण्याचे काम केले आहे.

ठळक मुद्देसहषराम कोरोटे : काँग्रेस कमिटीतर्फे सभेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : तालुक्यासह संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस पक्षाने नेहमी शेतकºयांचा आवाज उचलण्याचे काम केले आहे. भाजपने केंद्र व राज्यात सत्तेत येण्यासाठी शेतकरी व सुशिक्षित बेरोजगारांना मोठे आश्वासन देऊन सहानुभूती दाखविली. आज सत्तेवर आल्यानंतर े दिलेले आश्वासन विसरत केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर महागाई वाढवून सामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी केले.तालुका काँग्रेस कमिटीद्वारे कोरोटे यांच्या निवासस्थानी ग्रामपंचायत निवडणुकीच्या संदर्भात आयोजित सभेत मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. सदर सभा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हा महासचिव सहषराम कोरोटे, गोंदिया जिल्हा महिला काँग्रेसचे अध्यक्ष तथा जि.प. सदस्य उषा शहारे, जि.प. सदस्य माधुरी कुंभरे, देवरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संदीप भाटीया, नगर पंचायतचे उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, माजी सभापती वसंत पुराम, तालुका महासचिव बळीराम कोटवार, माजी पं.स. सदस्य सोनू नेताम, विधानसभेचे युवक काँग्रेस अध्यक्ष नरेश राऊत, अविनाश टेंभरे, बबलू कुरैशी, संदीप मोहबीया, गणेश भेलावे यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ता महिला, पुरुष व युवक उपस्थित होते.पुढे बोलताना कोरोटे यांनी, केंद्रात काँग्रेसची सरकार असताना घरगुती गॅस सिलेंडरचे दर ३८२ रुपये करायला ४० वर्षे लागले. परंतु विद्यमान भाजप सरकारने ४० महिन्यांतच ७८४ रुपये केले. राज्य सरकारने दुष्काळग्रस्त गावाची घोषणा केली. मात्र त्या गावातील शेतकºयांना मदत राशी अद्याप मिळाली नाही. सुशिक्षित बेरोजगार युवकांकरिता रोजगाराची सोय नाही. सरकारच्या अपयशांना सर्व जनतेसमोर उपस्थित करुन विकासाच्या नावावर ग्रा.पं.च्या सरपंच व सदस्यांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा जोरदार प्रचार करुन तालुक्यातील २५ ग्रा.पं.च्या निवडणुकीत काँग्रेसचाच झेंडा फडकावा कारण येणारा काळ हा काँग्रेस पक्षाचाच आहे असे मत व्यक्त केले.याप्रसंगी कटरे यांनी, सर्वसामान्य जनतेत विद्यमान भाजप सरकारच्या प्रती नाराजीचे वातावरण आहे. पेट्रोल व डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमती व कृषी उत्पादनात समर्थन दरात कपात या सारखे अनेक मुद्दांनी केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरली आहे. येत्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत पक्षाच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोराने प्रचार करावा असे मत व्यक्त केले.जिल्हा महिला काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष शहारे यांनी, काँग्रेस सरकारने महिलांना ५० टक्के आरक्षण देवून राजकारणात पुरुषांसोबत बरोबरीचा दर्जा दिला. तर भाजप सरकारने दैनंदिन व्यवहारातील उपयोगात येणाºया वस्तुंचे भाव वाढवून महिलांच्या विश्वासाला आघात पोहोचविला आहे. त्यांचे प्रत्युत्तर येत्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत महिला देणार असल्याचे मत व्यक्त केले.या सभेदरम्यान काँग्रेस पक्षाच्या विचार धारेशी प्रभावित होवून भाजप पक्ष सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश करणारे पुराडाचे प्रभू उईके, अशोक शेंडे आणि चिचेवाडाचे महेंद्र कोवाची व देवराज भोयर यांचा पक्षाचा शेला व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.प्रास्ताविक तालुकाध्यक्ष संदीप भाटीया यांनी मांडले. संचालन युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष नरेश राऊत यांनी केले. आभार माजी सभापती वसंत पुराम यांनी मानले. दरम्यान निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली.