याप्रसंगी समाजाचे जिल्हाध्यक्ष एल. यू. खोब्रागडे, सचिव शालीकराम लिचडे, कोषाध्यक्ष तेजराम मोरघडे व सहसचिव यशोधरा सोनवाने प्रामुख्याने उपस्थित होते. अध्यक्षपदी प्राजक्ता रणदिवे, सचिवपदी हर्षा आष्टीकर, कोषाध्यक्ष गीता दहीकर, सहकोषाध्यक्ष चेतना रामटेककर, उपाध्यक्ष वर्षा तिडके व ज्योती किरणापुरे, तर सहसचिवपदी मीनाक्षी रहमतकर, अनिता मुरकुटे व उषा मोरघडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्या म्हणून शैलजा सोनवाने, पद्मा भदाडे, मीनाक्षी तिडके, ललीता हलमारे, जयश्री वारजूरकर, पुष्पा भांडारकर, वत्सला पालांदूरकर, अनिता डोंगरे, लता पेशने, पुष्पा भांडारकर, जिजा सोनवाने, तर संगीता बनपूरकर यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे जिल्हाध्यक्ष एल. यू. खोब्रागडे, सचिव शालीकराम लिचडे, तेजराम मोरघडे, यशोधरा सोनेवाने व शिला इटानकर यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. रणदिवे यांनी सूत्रसंचालन, तर चेतना रामटेककर यांनी आभार मानले.
जैन कलार समाज महिला कार्यकारिणीचे गठण ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 4:30 AM