लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आरोग्य विभाग गोंदिया येथे कार्यरत दोन कंत्राटी कर्मचाºयांना नागपूर विद्यापीठात नियमित सेवेत नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन भंडारा येथील माजी नगरसेवक तथा तत्कालीन सिनेट सदस्य महेंद्र निंबार्ते याने त्यांची १० लाख रूपयांनी फसवणूक केली. याबाबत १६ नोव्हेंबर २०१७ रोजी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.सन २०१३-१४ वर्षात नागपूर विद्यापीठ नागपूर अंतर्गत शिक्षकेतर रिक्त पदांची गट अ ते गट ड संवर्गाची सरळ सेवा भरतीची जाहिरात २९ जून २०१३ रोजी प्रकाशित झाली होती. त्यावेळी भंडारा येथील रहिवासी तथा तत्कालीन नगर सेवक महेंद्र आनंदराव निंबार्ते (४०) हे नागपूर विद्यापीठात सिनेट सदस्य म्हणून पदावर होते.महेंद्र निंबार्ते याने दिलेल्या प्रलोभनाचे तिरोडा येथील दोन युवकसुद्धा बळी पडले. यात पवन वासनिक व त्यांच्या नात्यातील मामा निशांत बन्सोड यांचा समावेश आहे. पवन वासनिक हे सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा क्षयरोग केंद्र गोंदिया येथे वरिष्ठ प्रयोगशाळा पर्यवेक्षक पदावर कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. तर निशांत बन्सोड हे केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय गोंदिया येथे सांख्यिकी अधिकारी या पदावर कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. याचाच लाभ घेत निंबार्ते याने त्या दोघांना नागपूर विद्यापीठात नियमित सेवेत शिक्षकेतर अधीक्षक गट-ब अधिकारी या पदावर नोकरी लावून देण्याचे प्रलोभन दिले.यानंतर निंबार्ते याने सदर नोकरीकरिता कोणतीही परीक्षा नसल्याने व मुलाखत घेवून नियुक्ती होणार असल्याने प्रथम हप्ता म्हणून दोघे मिळून पाच-पाच लाख असे एकूण १० लाख रूपयांची मागणी केली. परंतु त्यावेळी एवढी रक्कम उपलब्ध नसल्याने पवन यांनी आपल्या आयसीआयसीआय बँक शाखा गोंदिया येथून २ जानेवारी २०१४ रोजी निंबार्ते याच्या आयसीआयसीआय बँक शाखा भंडारा येथील (०४९५०१५००७६७) या खाते क्रमांकावर तीन लाख रूपये ट्रान्सफर केले. परंतु निंबार्ते याने सर्व रक्कम नगदी द्यावी लागणार असल्याचे सांगून दुसºया दिवशी ३ जानेवारी २०१४ रोजी पवन यांच्या खात्यात सदर रक्कम वळती केली.यानंतर दोघेही नोकरीसाठी वारंवार निंबार्ते याला विचारणा करू लागले. परंतु वर्ष लोटूनसुद्धा नोकरी काही लावून दिली नाही. उडवाउडवीची उत्तरे देवून टाळाटाळ करू लागला. त्यामुळे दोघांनी निंबार्ते याच्या भंडारा येथील निवासस्थानी वारंवार चकरा मारल्या. परंतु तो कधीच मिळाला नसल्याने व फोनवरील संपर्कसुद्धा बंद केल्याने आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यामुळे वासनिक यांनी गोंदिया शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल केला. तपास सहायक पोलीस निरीक्षक नार्वेकर करीत आहेत.
माजी सिनेट सदस्य निंबार्तेवर गोंदियात फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 10:26 PM
आरोग्य विभाग गोंदिया येथे कार्यरत दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना नागपूर विद्यापीठात नियमित सेवेत नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन भंडारा येथील माजी नगरसेवक तथा तत्कालीन सिनेट सदस्य महेंद्र निंबार्ते याने त्यांची १० लाख रूपयांनी फसवणूक केली.
ठळक मुद्देनोकरी लावून देण्याचे प्रकरण : १० लाखांनी दोघांना गंडविले