लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असून यात आपल्या बहुमुल्य मतदानाचा हक्क बजावून या उत्सवाचे भागीदार होण्यासाठी प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये उत्साह आहे. वयाची अठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होतो. या अंतर्गत जिल्ह्यातील ३९ हजार ८३२ युवा मतदार येत्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच मतदानाचा हक्क बजाविणार असल्याने याबाबत त्यांच्यात प्रचंड उत्सुकता आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राची निवडणूक येत्या ११ एप्रिलला होवू घातली आहे. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक जनजागृती केली जात आहे. मतदार जागृतीसाठी लोकमतने सुध्दा पुढाकार घेतला असून ज्याना मतदानाचा अधिकार मिळाला आहे त्या प्रत्येकांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होवून आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या या उत्सवाचे भागीदार होण्याचे आवाहन केले आहे. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवकांमध्ये संपूर्ण निवडणूक प्रक्रियेला घेवून उत्सुकता असते. मतदान ओळख पत्रापासून ते मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याच्या प्रक्रियेबाबत विविध शंका असतात. मात्र या शंका सुध्दा आता निवडणूक विभागाकडून व्यापक स्तरावर करण्यात येत असलेल्या जनजागृती मोहीमेमुळे दूर झाल्या आहेत. आपला क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणारा लोकप्रतिनिधी कसा असावा, त्याला आपल्या क्षेत्रातील प्रश्नांची जाण व त्या प्रश्नांना सभागृहात वाचा फोडण्याची क्षमता असावी, तसेच तो लोकप्रतिनिधी मतदारांच्या संपर्कात असावा या सर्व अपेक्षा मतदारांना असतात. याच अपेक्षा युवा मतदारांना सुध्दा आहेत. कुठल्याही देशातील युवा शक्ती ही महत्त्वपूर्ण समजली जाते, कारण त्यांच्यावरच देशाचे पुढील भविष्य अवलंबून असते. त्यामुळे युवकांचा कल आपल्याकडे वळविण्यासाठी सर्वांचाच कल असतो. होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीत सुध्दा युवकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात १७ लाख ९१ हजार मतदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यापैकी ३९ हजार ८३२ युवा मतदार प्रथमच या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजाविणार असून मतदानाला घेवून त्यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे.मागील दहा वर्षांत प्रथमच मतदार संख्येत वाढनिवडणूक व मतदान प्रक्रियेला घेवून हळूहळू नागरिकांमध्ये जनजागृती वाढत आहे. त्यामुळेच एकूण मतदारांच्या आकडेवारीत मागील दहा वर्षांच्या तुलनेत वाढ होत असल्याचे चित्र आहे. २००९ मध्ये राबविण्यात आलेल्या मोहीमेत १० हजार तर २०१४ मध्ये १७ हजार मतदारांची वाढ झाली होती. तर यंदा प्रथमच ३९ हजार ३२ मतदारांची वाढ झाली आहे.दिव्यांग मतदारांच्या संख्येत वाढनिवडणुकी दरम्यान मतदान करण्यासाठी दिव्यांगामध्ये पूर्वी अनुत्सुकता दिसून येत होती. मात्र आता हे चित्र बदलले असून दिव्यांग सुध्दा निवडणूक व मतदान करण्याबाबत जागृत होत असल्याचे दिलासा दायक चित्र आहे. जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघात एकूण २ हजार ९१३ दिव्यांग मतदार आहेत. यात गोंदिया विधानसभा क्षेत्रात ६६५, अर्जुनी ८४३, तिरोडा ४५२ व देवरी आमगाव विधानसभा क्षेत्रात ९५३ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधाएकही दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे मतदान केंद्रावर व्हिलचेअर, स्ट्रेचरची तसेच दिव्यांग मतदारांनी मागणी केल्यास त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी वाहनाची सुविधा उपलब्ध करु दिली जाणार आहे. तसेच मतदानाच्या प्रक्रियेची माहिती दिव्यांगांना समजावी यासाठी त्यांच्यासाठी सांकेतिक भाषेत मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली.जिल्हाधिकाऱ्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवादयेत्या ११ एप्रिलाला होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी आदिवासी व दुर्गम देवरी तालुक्यातील विद्यार्थ्यांशी मंगळवारी (दि.१२) संवाद साधला. तसेच किती विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी केली, किती जणांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे, मतदान प्रक्रियेबाबत किती विद्यार्थ्यांना माहिती आहे, याची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून घेतली. या दरम्यान बºयाच १८ वर्ष वय पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी केली नसल्याची बाब पुढे आली. त्यांनी लगेच विद्यार्थ्यांना सहा नंबरचा फार्म भरुन मतदार नोंदणी करण्यास सांगितले.मतदार नोंदणी मोहिमेचा फायदाजिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभागातर्फेनवीन मतदार नोंदणीसाठी १ सप्टेंबर ते ३० आॅक्टोबर दरम्यान मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. यात ३३ हजार ७२८ मतदार वाढले. २३ ते २४ फेब्रुवारी दरम्यान राबविलेल्या मोहीमेत ३ हजार ९२५ आणि २ ते ३ मार्च दरम्यान २ हजार १४९ मतदार वाढले. यात फार्म क्रमांक ६ भरुन मतदार नोंदणी करणाºया युवा मतदारांची संख्या अधिक होती.
चाळीस हजार युवा मतदार प्रथमच करणार मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 9:32 PM
निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असून यात आपल्या बहुमुल्य मतदानाचा हक्क बजावून या उत्सवाचे भागीदार होण्यासाठी प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये उत्साह आहे. वयाची अठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होतो. या अंतर्गत जिल्ह्यातील ३९ हजार ८३२ युवा मतदार येत्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच मतदानाचा हक्क बजाविणार असल्याने याबाबत त्यांच्यात प्रचंड उत्सुकता आहे.
ठळक मुद्देजनजागृतीवर भर: नवमतदारांमध्ये उत्साह, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन