शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

दरेकसा घाटावर लुटणाऱ्या चौघांना अटक, ४ लाखांचा माल जप्त 

By अंकुश गुंडावार | Published: June 07, 2023 6:28 PM

मारहाण करून ८१ हजार पळविले होते

गोंदिया : सालेकसा तालुक्यातील दरेकसा घाटावर ३० मे रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास गिरवर उमराव पिछोरे रा. लट्टीटोला (बाम्हणी) हे नातेवाइकांसह काटी बैल बाजारातून १७ बैल खरेदी करून एका ट्रकमध्ये भरून रायपूर (छत्तीसगड) येथे जात असताना त्यांच्या जवळून ८१ हजार रुपये रोख हिसकावून नेले. या प्रकरणातील चार आरोपींना सालेकसा पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई ६ जून रोजी करण्यात आली आहे.

आरोपी तेजस ठाकरे, रा. मनेरी, तुलसीराम चौधरी रा. लोहारा, नीलेश ऊर्फ विक्की मेश्राम व इतर आरोपींनी दोन चारचाकी वाहनाने जाऊन दरेकसा घाट येथे गिरवर उमराव पिछोरे यांचा ट्रक अडवून लोकांना काठीने व लोखंडी पाइपने जबर मारहाण केली. त्यांच्याकडील ८१ हजार रुपये जबरीने हिसकावून नेले होते. यासंदर्भात सालेकसा पोलिसांत भादंविच्या कलम ३९७, ३९५, ३४१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सालेकसा पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपी तुलसीराम दवनलाल चौधरी (३९) रा. लोहारा, ता. लांजी, जि. बालाघाट (मध्य प्रदेश), खिलेश छोटेलाल गौतम (२५), दिवाकर ऊर्फ दीपक अरुण गौतम (२३), अमरचंद हेमराज हरिणखेडे (३०) तिन्ही रा. रामुटोला (वडगाव) ता. लांजी जि. बालाघाट (मध्य प्रदेश) यांना अटक करण्यात आली. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले वाहन टाटा सुमो एम.एच.३७ ए ३५७५ किंमत १ लाख ५० हजार, महिंद्रा झायलो एम.एच. ३१ बी.सी. ३६६४ किंमत २ लाख ५० हजार रुपये असा एकुण ४ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

गुन्ह्यात वापरलेले साहित्य केले जप्त

आरोपी तुलसीराम दवनलाल चौधरी (३९) रा. लोहारा, ता. लांजी, जि. बालाघाट (मध्य प्रदेश) याने सीताराम वर्मा यांच्या जवळून जबरीने काढून घेतलेले १० हजार रुपये तसेच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले हत्यार, लाकडी काठी, लोखंडी पाइप जप्त करण्यात आले आहे. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे करीत आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, पोलिस उपनिरीक्षक गणेश शिंदे, पोलिस नायक बिसेन, पोलिस शिपाई इंगळे, पोलिस शिपाई पगरवार, विकास वेदक, महिला पोलिस शिपाई आंबाडारे, चालक पोलिस नायक अग्निहोत्री, तसेच तांत्रिक शाखेचे पोलिस हवालदार दीक्षित दमाहे यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकgondiya-acगोंदिया